ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या घरच्या मैदानातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या लढतीत स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या जोडीनं शतकी भागीदारीसह खास विक्रमाला गवसणी घातलीये.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करताना या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी रचली. दोघींच्यात ताळमेळ ढासळल्यानं ही जोडी फुटली. पण त्याआधी भारताकडून डावाला सुरुवात करताना कमी डावात सर्वाधिक वेळा शतकी भागीदारीचा रेकॉर्ड दोघींनी आपल्या नावे केला.
स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या जोडीनं वनडेतील १३ डावात पाचव्या वेळी डावाला सुरुवात करताना शतकी भागीदारीचा डाव साधला. भारतीय संघाकडून कोणत्याही सलामी जोडीनं केलेली ही विक्रमी कामगिरी आहे.
जया शर्मानं अंजू जैनच्या साथीनं २७ डावात पाच वेळा शतकी भागीदारीचा विक्रमही नोंदवला आहे.
याआधी जया शर्मा आणि करूणा जैन या जोडीनं वनडेत २५ डावात भारताच्या डावाची सुरुवात करताना ५ वेळा शतकी भागीदारी केल्याचा रेकॉर्ड आहे.
स्मृती मानधना हिने जेमिमा रॉड्रिग्जच्या साथीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना १३ डावात ३ वेळा शतकी भागीदारी केल्याचा रेकॉर्ड आहे.
स्मृती मानधना आणि प्रतिका रावल ही जोडी वनडेत सातत्याने संघाला दमदार सुरुवात करुनन देताना दिसते. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी या जोडीचा सिलसिला असाच सुरु राहावा, अशी टीम इंडियासह भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा असेल.