Join us

"कुठलं यश?? तो काय बडबडतोय मला माहिती नाही..."; शुबमन गिलचं पॅट कमिन्सला चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 21:32 IST

Open in App
1 / 5

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेली पहिली कसोटी मोठ्या दिमाखात जिंकली आणि मालिकेची विजयी सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केले. दिवस-रात्र कसोटीत विजय मिळवून त्यांना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.

2 / 5

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबर पासून ब्रिसबेनमध्ये सुरू होणार आहे. गाबाच्या मैदानावर तिसरी कसोटी सुरु होण्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शा‍ब्दिक सामना पाहायला मिळाला.

3 / 5

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने पत्रकार परिषद घेतली. त्यात प्लेइंग ११ मधील बदलाबाबत स्पष्टपणे सांगितले. त्यासोबतच एका मुद्द्यावरून त्याने भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला. भारताविरूद्ध बाऊन्सर प्लॅनचा ऑस्ट्रेलियाला फायदा झाला, असे तो म्हणाला.

4 / 5

'टीम इंडियातील फलंदाजांविरूद्ध आमचा बाऊन्सरचा प्लॅन होता. त्याचा फायदा झाला नसता तर आम्ही 'प्लॅन बी' पण तयार ठेवला होता. पण बाऊन्सर चेंडूंनी भारतीय फलंदाजा बराच त्रास दिला आणि आमच्या प्लॅनला यश आले,' असे पॅट कमिन्स म्हणाला.

5 / 5

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया