Join us

Shubman Gill : शुभमन गिलने स्विमिंग पूलमध्ये दाखवले सिक्स पॅक अॅब्स, क्रिकेटप्रेमी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 19:50 IST

Open in App
1 / 6

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ रांचीमध्ये दाखल झाल आहे. या मालिकेत भारतीय संघ ०-१ ने पिछाडीवर पडलेला आहे. अशा परिस्थितीर रांचीतील सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. दरम्यान, रांचीमध्ये दाखल झाल्यावर भारताचा सलामीवीर शुभमन गिल स्विमिंग पूलमध्ये मौजमस्ती करताना दिसला.

2 / 6

शुभमन गिलने काल इन्स्टाग्रामवर तीन फोटो अपलोड केले. यातील पहिल्या फोटोमध्ये शुभमन गिल, शिखर धवन आणि इशान किशन मस्ती करताना दिसत आहेत. यावेळी इशानने सेल्फीही घेतल्या.

3 / 6

शुभमनने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये हे तिघेही क्रिकेटपटू पुलामध्ये कडेला उभे असल्याचे दिसत आहेत. यामध्ये शुभमन आणि इशान फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. या फोटोमध्ये शुभमन गिलचे सिक्स पॅक अॅब्स स्पष्टपणे दिसत आहेत.

4 / 6

शुभमन गिलने शेअर केलेल्या तिसऱ्या फोटोमध्ये त्याच्यासोबत केवळ इशान किशन दिसत आहे. दोघेही स्विमिंग पूलमध्ये आहेत. मात्र त्यांचा चेहरा कॅमेऱ्याकडे नाही आहे.

5 / 6

शुभमन गिल, इशान किसन आणि शिखर धवनचे हे फोटो सोशल मीडियावर खूप शेअर होत आहेत. कृणाल पांड्याने या फोटोखाल फायर इमोजी शेअर केली आहे. तर एका युझरने लिहिले आहे की, २५ की पेप्सी शुभमन भाई सेक्सी...

6 / 6

शुभमन गिल आणि इशान किशन हे दोघेही अंडर-१९ च्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात, तसेच ते चांगले मित्र आहेत. या दोघांसोबत शिखर धवनही मस्तीच्या मुडमध्ये दिसला.

टॅग्स :शुभमन गिलभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ
Open in App