Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shane Warn: फिरकीचा जादूगार...शेन वॉर्नच्या निधनाने चाहते भावूक, जुन्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 20:43 IST

Open in App
1 / 10

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झाले. फॉक्स क्रिकेटने ही माहिती दिली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने ट्विट करून शोक व्यक्त केला.

2 / 10

तसेच काही परदेशी प्रसारमाध्यमांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. वॉर्नच्या मॅनेजमेंट टीमकडूनही एक स्टेटमेंट जारी करून याबाबत माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे. वॉर्न थायलंड येथे होता आणि तेथे त्याला हार्ट अटॅक आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

3 / 10

शेन वॉर्नच्या निधनानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याच्या आठवणी जागवल्या जात आहेत. वॉर्नचे जुने फोटो शेअर करत त्याबद्दल भावना व्यक्त होत आहेत.

4 / 10

वॉर्नच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं असून सोशल मीडिया भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. शेनच्या निधनानंतर एका तासात 30 हजार ट्विट पडले असून ट्विटरवर हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.

5 / 10

इंडियन हिस्ट्री पिक नावाच्या ट्विटर हँडलवरुन सचिन तेंडुलकर, सर डॉन ब्रॅडमन आणि शेन वॉर्नचा 1998 सालच्या भेटीचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

6 / 10

कार्टुनिस्ट सतिश आचार्य यांनी कार्टुन चित्र रेखाटक शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, मी हे वाचण्यास समर्थ नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

7 / 10

शेन वार्नला सोशल मीडियातून श्रद्धांजली वाहण्यात येत असून अनेक दिग्गजांना त्याच्या निधनाने धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीनेही ट्विट करुन क्रिकेट जगताचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलंय.

8 / 10

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनीही ट्विट करुन शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, वॉर्नच्या निधनाच्या अचानक आलेल्या वृत्ताने मलाही धक्का पोहोचल्याचे त्यांनी म्हटलं.

9 / 10

फिरकीचा जादूगार... या कॅप्शनने वॉर्नचे काही व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. तसेच, अनेकांनी शेनसोबतचे फोटोही शेअर केले आहेत.

10 / 10

आपल्या फिरकी गोलंदाजीच्या आणि स्मीतहास्यातून त्याने कोट्यवधींच्या मनावर राज्य केलं. म्हणून, त्याच्या आठवणी जागवताना क्रिकेटचा इतिहास पुन्हा नव्याने झळकताना दिसत आहे.

टॅग्स :आॅस्ट्रेलियासचिन तेंडुलकरसोशल मीडियाट्विटर
Open in App