Join us

Rahul Dravid Babar Azam: "हा क्रिकेटर म्हणजे Pakistan चा राहुल द्रविडच"; बाबर आझमचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 18:31 IST

Open in App
1 / 6

Rahul Dravid, Pakistan Babar Azam: भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड हा युवा पिढीसाठी आदर्श आहे. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात द्रविडच्या संयमी फलंदाजीची ख्याती आहे.

2 / 6

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने नुकतेच एका मुलाखतीत राहुल द्रविडबाबत एक विधान केले. पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील एका खेळाडूची तुलना त्याने थेट राहुल द्रविडशी केली.

3 / 6

पाहूया नक्की कोणत्या खेळाडूबद्दल बोलला बाबर आझम...

4 / 6

बाबर आझम नुकत्याच झालेल्या मुलाखतीत म्हणाला की पाकिस्तानी संघात एका युवा खेळाडूला संधी मिळाली आहे. त्याला त्याचे सहकारी दुसरा द्रविड म्हणजेच 'पाकिस्तानचा द्रविड' अशी हाक मारतात.

5 / 6

सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असलेला राहुल द्रविड आपल्या कारकिर्दीतील अनेकांचा हिरो होता. त्याच्या शास्त्रशुद्ध फलंदाजीची चर्चा व्हायची. अगदी तसंच, या नव्या खेळाडूबाबत बाबर आझमने वक्तव्य केले.

6 / 6

बाबर आझम म्हणाला, 'पाकिस्तानच्या वन डे संघात संधी मिळालेला अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) याची फलंदाजी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीची आहे. तसेच तो चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतो आणि सोडतो. फलंदाजी करताना तो डोक्याने अतिशय स्पष्टपणे क्रिकेट खेळतो. म्हणूनच आम्ही त्याची तुलना केन विल्यमसन किंवा राहुल द्रविडशी करत असतो. आम्ही तर त्याला द्रविडच म्हणतो.'

टॅग्स :राहुल द्रविडबाबर आजमपाकिस्तानभारत
Open in App