क्रिकेटपेक्षा दिनेश कार्तिकच्या पत्नीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत राहिला मुरली विजय; जाणून घ्या स्टोरी

Murali Vijay Retirement : मुरली विजयचे नाव समोर येताच त्यांच्या पत्नीचा उल्लेख नक्कीच होतो. वास्तविक त्याने त्याचा सहकारी क्रिकेटर दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीशी लग्न केले.

भारताचा कसोटी संघातील सलामीवीर मुरली विजय ( Murali Vijay Retirement) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा मुरली विजयची चर्चा ही दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीसोबतच्या अफेअर्समुळे अधिक रंगली.

भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणाऱ्या मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. याची घोषणा करत त्यांनी सोशल मीडियावर एक नोट शेअर केली आहे.

मुरली विजयने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १५ वर्षांच्या या कारकिर्दीत मुरली विजयने ६१ कसोटी, १७ वन डे आणि ९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे ३९८२, ३३९ आणि १६९ धावा केल्या आहेत. मुरली विजयने तिन्ही फॉरमॅटमध्ये १२ शतके आणि १६ अर्धशतके झळकावली आहेत.

मुरली विजयने २००९ मध्ये पहिला आयपीएल सामना खेळला. तो CSK मधील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. मुरली विजय गेल्या २ हंगामात आयपीएलमध्येही दिसला नव्हता. त्याने आयपीएल कारकिर्दीत १०६ सामने खेळले आणि एकूण २६१९ धावा केल्या. मुरलीने आयपीएलमध्ये २ शतके आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत.

मुरली विजयचे नाव समोर येताच त्यांच्या पत्नीचा उल्लेख नक्कीच होतो. वास्तविक त्याने त्याचा सहकारी क्रिकेटर दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीशी लग्न केले.

मुरली विजय आणि त्याची पत्नी निकिता प्रेमात पडले, दोघांचे लग्न झाले पण वाटते तितके सोपे नव्हते. खरंतर निकिता आधीच विवाहित होती.

मुरली विजयचा मित्र आणि क्रिकेटर दिनेश कार्तिकसोबत. कार्तिक आणि निकिता एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते, दोघांनी लग्न केले.

मुरली विजय आणि दिनेश कार्तिक देशांतर्गत क्रिकेटमध्येही एकत्र खेळायचे. त्यानंतर ते अनेकवेळा आयपीएलमध्ये एकत्र खेळले.

२०१२ मध्ये आयपीएल दरम्यान मुरली विजयने कार्तिकची पत्नी निकिता हिच्याशी मैत्री केली होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दिनेश कार्तिकला हे कळताच त्यांच्या मैत्रीत आणि कौटुंबिक आयुष्यात भूकंप झाला.

दिनेश कार्तिकने निकिताला घटस्फोट दिला. यानंतर निकिताने मुरली विजयसोबत लग्न केले. आता दोघेही एकत्र राहतात. दिनेश कार्तिकही दुसरं लग्न करून स्थिरावला. कार्तिकने स्क्वॉशपटू दीपिकाशी लग्न केले.