Join us

Prithvi Shaw Break Up with Girlfriend Actress Prachi: पृथ्वी शॉ अन् गर्लफ्रेंडमध्ये काहीतरी बिनसलं... दोघांनी एकमेकांना केलं अनफॉलो! ब्रेकअपच्या रंगल्यात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 14:54 IST

Open in App
1 / 9

Prithvi Shaw Break Up with Girlfriend Actress Prachi: भारतीय क्रिकेटपटू आणि दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने यंदाच्या IPL हंगामात संमिश्र स्वरूपाची कामगिरी केली. काही सामन्यात त्याने चांगल्या धावा केल्या, तर काही वेळा तो लवकर बाद झाला.

2 / 9

पृथ्वी शॉ आपल्या खेळाव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीमुळेही अनेकदा चर्चेत आला आहे. ती गोष्ट म्हणजे एका अभिनेत्रीशी सुरू असलेल्या अफेअरच्या चर्चा.

3 / 9

पृथ्वी शॉ आणि मॉडेल-अभिनेत्री प्राची सिंग (Prachi Singh) हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण आता मात्र त्यांचं ब्रेक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

4 / 9

२०२०च्या सुरूवातीला पृथ्वी आणि प्राची यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांबाबत मत मांडण्यात अँक्टिव्ह होते.

5 / 9

प्राची इन्स्टाग्रामवर केवळ २०० लोकांनाच फॉलो करते त्या यादीत पृथ्वी शॉ होता. तसेच पृथ्वी शॉ देखील २४५ जणांनाच फॉलो करतो. त्यात तिचा समावेश होता.

6 / 9

आता मात्र या दोघांनी आपापल्या इन्स्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच प्राची आणि पृथ्वी शॉ यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत. वास्तविक, ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते अशी अधिकृत माहिती दोघांपैकी कोणीही दिलेली नव्हती.

7 / 9

दरम्यान, प्राची सिंग कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल....

8 / 9

प्राची सिंग ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. २२ जुलै १९९५ ला मुंबईत तिचा जन्म झाला. २०१९ पासून ती मनोरंजन विश्वात कार्यरत आहे.

9 / 9

प्राचीचे शिक्षण मुंबई विद्यापीठातूनच पूर्ण झाले आहे. प्राची अभिनयासोबतच नृत्यकलेतही पारंगत आहे.

टॅग्स :पृथ्वी शॉटेलिव्हिजनबॉलिवूडदिल्ली कॅपिटल्सभारतीय क्रिकेट संघ
Open in App