Join us
Daily Top 2Weekly Top 5

नॅटली ते स्मृती! WPL इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाऱ्या 'रनरागिणी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:34 IST

Open in App
1 / 10

महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामात अखेर या स्पर्धेतील पहिले शतक पाहायला मिळाले.

2 / 10

मुंबई इंडियन्सच्या संघाकडून या स्पर्धेत १००० धावांचा पल्ला गाठणारी नॅट सायव्हर ब्रंट हिने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक शतक झळकावले.

3 / 10

इथं एक नजर टाकुयात WPL च्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या उभारणाऱ्या पाच बॅटर्सच्या खास रेकॉर्डवर...

4 / 10

मुंबई इंडियन्सच्या नॅट सायव्हर ब्रंटन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध नाबाद शंभर धावांची खळी केली. २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या सामन्यात ही कामगिरी नोंदवली.

5 / 10

UP वारियर्स संघाकडून सोफी डिव्हाइन हिने गत हंगामात (२०२५) रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध ९९ धावांची नाबाद खेळी साकारली होती. तिचे शतक अवघ्या एका धावेनं हुकले होते.

6 / 10

UP वॉरियर्सच्या संघाकडून गत हंगामात (२०२५) जॉर्जिया वॉल हिने देखील नाबाद ९९ धावांची खेळी केली होती. कमालीचा योगायोग हा की, तिची ही खेळीही RCB विरुद्धच्या सामन्यात आली होती.

7 / 10

एलिसा हिली हिने २०२३ च्या WPL च्या हंगामात UP वॉरियर्सकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाविरुद्ध नाबाद ९६ धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे.

8 / 10

WPL २०२५ च्या हंगामात बेथ मूनी हिने गुजरात जाएंट्स विरुद्धकडून खेळताना UP वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात नाबाद ९६ धावांची खेळी केली होती.

9 / 10

WPL २०२६ च्या हंगामात RCB ची कॅप्टन आणि टीम इंडियाची क्वीन स्मृती मानधना शतकाच्या जवळ पोहचली होती. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात तिने ९६ धावांची खेळी केली होती. तिचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले होते.

10 / 10

मुंबई इंडियन्सची कर्णधार हमरनप्रीत कौरही या यादीत आहे. २०२४ च्या हंगामात गुजरात जाएंट्स विरुद्ध तिने नाबाद ९५ धावा केल्या होत्या.

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगमहिला टी-२० क्रिकेटस्मृती मानधनाहरनमप्रीत कौरबीसीसीआयभारतीय महिला क्रिकेट संघ