महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाची सलामीची बॅटर स्मृती मानधना सातत्याने दमदार कामगिरी करून दाखवत आहे.
इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत स्मृती मानधना हिने ४५०० धावांचा आकडा पार केला.
इथं एक नजर टाकुयात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय महिला बॅटर्सच्या खास रेकॉर्डवर
महिला क्रिकेट जगतात मितालीनं अधिराज्य गाजवलं आहे. आपल्या कारकिर्दीत तिने वनडेत ७८०५ धावा केल्या आहेत. ती भारताचीच नव्हे तर एकंदरीत वनडेत सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटर आहे.
भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत स्मृती मानधना ४५०० पेक्षा अधिक धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ४००० धावांचा टप्पा जलदगतीने पार करण्याचा विक्रम स्मृतीच्या नावे आहे.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये १२६ डावांत ३९४३ धावा केल्या आहेत. महिला वनडेत सर्वोच्च १७१ * धावांचा विक्रमही तिच्या नावे आहे.
अंजुम चोप्राने महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये ११२ डावांत २८५६ धावा केल्या आहेत. ती भारतासाठी महिला क्रिकेटमधील पहिल्या मोठ्या स्टार खेळाडूंपैकी एक आहे. माजी कर्णधाराच्या नावे वनडेत एका शतकासह १८ अर्धशतकांची नोंद आहेय
दीप्ती शर्मानं महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २३०० धावा केल्या आहेत. याशिवाय तिने १३५ विकेट्सही घेतल्या आहेत.