मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावली आहेत. शतकांचे शतक झळकवणारा तो पहिला आणि एकमेव फलंदाज आहे.
रायपूरच्या मैदानातील पहिल्या शतकासह रनमशिन विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. कोहलीनं आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत ४७ वेगवेगळ्या मैदानात शतके झळकवण्याचा पराक्रम नोंदवला आहे.
क्रिकेटच्या मैदानात शतकांचा महारेकॉर्ड सेट करताना विक्रमादित्य सचिन तेंडुलकरनं ५३ वेगवेगळ्या मैदानात शतके झळकावली आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्डच आहे.
वनडेत सचिन तेंडुलकरनं ३४ वेगवेगळ्या मैदानात शतकी खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे. रायपूर वनडेतील शतकी खेळीसह कोहलीनं सचिनच्या वनडेतील वेगवेगळ्या मैदानात शतके झळकवण्याचा विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
किंग कोहलीनं वनडेतील तेंडुलकरच्या खास रेकॉर्डशी बरोबरीचा डाव साधला असला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मैदानात शतकी रुबाब गाजवण्याचा विश्व विक्रम अजूनही सचिन तेंडुलकरच्या नावेच आहे
रोहित शर्मानं आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत ३५ वेगवेगळ्या मैदानात शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. त्याच्याशिवाय रिकी पाँटिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस यांनीही प्रत्येकी ३५-३५ वेगवेगळ्या मैदानात शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
राहुल द्रविडने १९९६ ते २०११ या कालावधीत आंतरारष्ट्रीय कारकिर्दीत ३३ वेगवेगळ्या मैदानात शतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले.
श्रीलंकेचा माजी दिग्गज कुमार संगकाराने आपल्या कारकिर्दीत ३१ वेगवेगळ्या मैदानात शतकी खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे. वीरेंद्र सेहवागनंही आपल्या कारकिर्दीत ३१ वेगवेगळ्या मैदानात शतकी धमाका केल्याचा रेकॉर्ड आहे.