Join us  

Suryakumar Yadav: कॉलेजच्या वयातच जोडलं आयुष्यभराचं नातं; जाणून घ्या सूर्यकुमार यादवची मनोरंजक प्रेमकहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 6:27 PM

Open in App
1 / 6

भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या खूप चर्चेत आहे. आपल्या शानदार खेळीने सर्वांना आकर्षित करणाऱ्या सूर्याची प्रेमकहाणी देखील तितकीच आकर्षित करणारी आहे. सूर्यकुमार यादव याच्या पत्नीचे नाव देवीशा शेट्टी आहे. दोघांची पहिली भेट 2012 मध्ये झाली होती. चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 29 मे 2016 रोजी दोघे विवाहबंधनात अडकले.

2 / 6

सध्या आशिया चषकाचा थरार रंगला असून भारतीय संघ शानदार कामगिरी करत आहे. सूर्यकुमार यादवने हॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यात अवघ्या 26 चेंडूंत 68 धावांची खेळी करून धावांचा डोंगर उभारला. मिस्टर 360 म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. आयपीएलमध्ये केलेल्या उल्लेखणीय कामगिरीमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

3 / 6

2012 मध्ये सूर्यकुमार यादवची भेट दक्षिण भारतीय तरुणी देवीशा शेट्टीशी झाली होती. मुंबईतील पोद्दार पदवी महाविद्यालयात ही भेट झाली होती. तेव्हा सूर्यकुमार फक्त 22 वर्षांचा होता आणि देविशा त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होती. तिथे सूर्यकुमारने देविशाला डान्स करताना पाहिले होते आणि तेव्हापासूनच तो तिच्या प्रेमात पडला.

4 / 6

सूर्याने हळू हळू देविशाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याला यश मिळत गेले. काही दिवसांतच त्याने देविशावरचे प्रेम व्यक्त देखील केले. सूर्या देविशाच्या प्रेमात वेडा होताच मात्र यासोबत त्याने देविशाला आपल्या फलंदाजीचेही वेड लावले.

5 / 6

2012 ते 2016 पर्यंत हे कपल रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले. विशेष म्हणजे प्रेमविवाह करताना दोन्ही कुटुंबांनी देखील लगेच होकार दिला. कारण सूर्यकुमारने लग्नाच्या दोन वर्षांपूर्वीच आयपीएलद्वारे मोठे नाव कमावले होते. सूर्या आणि देविशाचा विवाह दक्षिण भारतीय रितीरिवाजांनुसार पार पडला.

6 / 6

देविशा ही एक सोशल वर्कर म्हणून काम करते. 2013 ते 2015 पर्यंत तिने 'द लाइटहाउस प्रोजेक्ट' या एनजीओसाठी स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. मुंबई इंडियन्सच्या सामन्यांमध्ये देविशा अनेकदा तिच्या पतीला चिअर करताना दिसली आहे. हे कपल अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवएशिया कप 2022भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट
Open in App