Sanju Samson : अशी कामगिरी करणारा संजू पहिला भारतीय! IPL स्पेशलिस्ट रैनासह MS धोनीचा विक्रम मोडला

आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला संजू सॅमसन

इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामातील ३७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर संजू सॅमसन गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरला. पण या सामन्यात फक्त ११ धावांच्या खेळीसह त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात तिसरी धाव पूर्ण करताच संजू सॅमसन याने IPL स्पर्धेत ५००० धावांचा टप्पा पार केला.

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन याने ३५५५ चेंडूत ५ हजार धावांचा पल्ला गाठला. या कामगिरीसह तो भारताकडून सर्वात जलदगतीने हा पल्ला गाठणारा खेळाडू ठरला आहे. त्याने सुरेश रैना आणि MS धोनी या दिग्गजांना मागे टाकले आहे.

IPL मध्ये सर्वात जलदगतीने ५००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा एबी डिविलयर्स अव्वलस्थानी आहे. त्याने ३२८८ चेंडूत ही कामगिरी करून दाखवली आहे.

ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नर याने IPL मध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळताना ३५५४ चेंडूत हा डाव साधला होता.

आयपीएल स्पेशलिस्ट सुरेश रैना हा आयपीएलमध्ये ५००० धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज आहे. त्याने ३६२० चेंडूत हा मैलाचा पल्ला गाठला होता.

भारताकडून लोकेश राहुलचाही या यादीत समावेश आहे. पंजाब किंग्स, लखनौच्या संघाकडून खेळल्यावर दिल्ली कॅपिटल्सचा झालेल्या लोकेश राहुलनं ३६८८ चेंडूत ५००० धावा पूर्ण केल्याचा रेकॉर्ड आहे.

चेन्नई सुपर किंग्सला पाच वेळा चॅम्पियन करणाऱ्या एमएस धोनीने हा पल्ला गाठण्यासाठी ३६९१ चेंडूचा सामना केला होता.