भारताकडूनच नव्हे तर क्रिकेट जगतात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा हिटमॅन रोहित शर्माच्या नावे आहे, ही गोष्ट जवळपास सर्वच क्रिकेट चाहत्यांना माहितीये.
पण तुम्हाला हे माहितीये का? भारतीय संघाकडून सरासरी कमी चेंडूत सर्वाधिक षटकार मारण्यात कोण आघाडीवर आहे? इथं जाणून घेऊयात आघाडीच्या ७ भारतीयांचा नावे असणारा खास रेकॉर्ड
२०० पेक्षा अधिक षटकार खात्यात असलेल्या भारतीय फलंदाजांपैकी एक असलेला युवीचा चेला अभिषेक शर्मा कमी चेंडूत षटकार मारण्यात आघाडीवर आहे. २४ वर्षीय युवा आणि स्फोटक बॅटरच्या भात्यातून सरासरी ९ चेंडूनंतर एक षटकार पाहायला मिळतो.
टीम इंडियातील बिग हिटर शिवम दुबे या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. १३.१३ च्या सरासरीसह त्याने आतापर्यंतच्या आपल्या टी-२० कारकिर्दीत २०८ षटकार मारले आहेत.
हार्दिक पांड्या हा देखील मोठी फटकेबाजी करण्यात माहिर आहे. सरासरी १३.१३ चेंडूनंत षटकार मारणाऱ्या पांड्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत २९८ षटकार मारले आहेत. आशिया कप स्पर्धेत तो षटकारांचे त्रिशतक साजरे करताना पाहायला मिळेल.
माजी अष्टपैलू युसूफ पठाण या यादीत चौत्या स्थानावर आहे. १४.३३ च्या सरासरीसह त्याने आपल्या टी २० कारकिर्दीत २४३ षटकार मारले आहेत.
IPL मध्ये आपल्या धमाकेदार बॅटिंगचा अंदाज दाखवून देणाऱ्या नितीश राणानं टी-२० कारकिर्दीत २४७ षटकार मारले आहेत. १४.४४ चेंडूच्या सरासरीसह त्याच्या भात्यातून षटकार पाहायला मिळतो.
सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा महा पराक्रम करून दाखवणाऱ्या युवीनं आपल्या टी-२० कारकिर्दीत २६१ षटकार मारले आहेत. त्याच्या भात्यातून आलेले हे षटकार १४.४५ च्या सरासरीसह आले आहेत.
भारताचा मिस्टर ३६० आणि टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या भात्यातून आतापर्यंत टी-२० मध्ये ३८० षटकार पाहायला मिळाले आहेत. चेंडुनुसार, षटकार मारण्याची त्याची सरासरी ही १४.८० अशी आहे.