भारतीय संघाचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड विवाहबंधनात अडकणार आहे. उद्या तो आणि उत्कर्षा पवार सातफेरे घेणार आहेत. ३ जूनला होणाऱ्या लग्नाची तारीख वराने त्याच्या हातावरील मेहंदीत लिहली आहे.
ऋतुराजच्या होणाऱ्या बायकोचं नाव उत्कर्षा पवार असून ती देखील पेशाने एक क्रिकेटर आहे. मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने आगामी WTC फायनलमधून माघार घेतली आहे, ज्याची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती.
ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्या मेहंदी सेरेमनीचे काही फोटो समोर आले आहेत. ऋतुराजने हातावर उत्कर्षाच्या नावाची मेहंदी काढल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे.
तसेच ऋतुराजच्या हातावर काढलेल्या मेहंदीचं डिजाइन देखील खास आहे. खरं तर त्याच्या एका हातावर लग्नाची तारीख लिहण्यात आली आहे.
तर ऋतुराजच्या दुसऱ्या हातावर दोघांच्याही नावाचे इंग्रजीतील पहिले अक्षर घेऊन बॅट व बॉलचं शानदार डिझाइन काढण्यात आलं आहे. ऋतुराजची मेहंदी क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधत आहे.
आयपीएल २०२३ च्या फायनलनंतर ऋतुराज आणि उत्कर्षा हे दोघेही चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत दिसले होते. ऋतुराजच्या होणाऱ्या बायकोचं नाव उत्कर्षा पवार असून ती देखील क्रिकेटर आहे. त्यामुळे उत्कर्षाच्या प्रेमात ऋतुराज क्लिन बोल्ड झाल्याचे चाहते म्हणत आहेत.
ऋतुराजच्या होणाऱ्या बायकोचं संपूर्ण नाव उत्कर्षा अमर पवार असे आहे. २४ वर्षी उत्कर्षाचा जन्म १३ ऑक्टोबर १९९८ मध्ये पुण्यात झाला. तसेच ऋतुराज आणि उत्कर्षा मागील मोठ्या कालावधीपासून एकमेकांना ओळखत असल्याचे देखील बोलले जात आहे.
मागील वर्षी उत्कर्षा एका जिम सेशनमध्ये ऋतुराजसोबत दिसली होती. मात्र, तरीदेखील ऋतुराजची होणारी बायको चाहत्यांसाठी एक मिस्ट्री गर्ल म्हणूनच राहिली आहे. कारण उत्कर्षा पवार सोशल मीडियावर सक्रिय नाही.
विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे मराठमोळ्या खेळाडूने आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून माघार घेतली. राखीव खेळाडू म्हणून तो भारतीय संघाचा हिस्सा होता पण आता त्याच्या जागी यशस्वी जैस्वाल भारतीय संघासोबत इंग्लंडला गेला आहे.
ऋतुराजच्या हातावरील मेहंदीत लिहल्याप्रमाणे उद्या म्हणजेच ३ जून रोजी दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.