Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टार क्रिकेटरची फिल्मी लव्ह स्टोरी... पहिल्या भेटीत प्रेमात पडला पण लग्न करायला घेतली ५ वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 20:02 IST

Open in App
1 / 8

भारतीय क्रिकेटर्स खेळासोबतच त्यांच्या लव्हस्टोरी मुळे चर्चेत असतात. विराट-रोहित-बुमराह... साऱ्यांचीच लव्ह-स्टोरी एखाद्या सिनेमासारखी आहे. तशीच प्रेमकहाणी भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूचीही आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

2 / 8

भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यानेही प्रेमाच्या पिचवर आपली जादू दाखवत बाजी जिंकली आहे. ईशांत शर्माची प्रेमकहाणी एखाद्या रोमँटिक चित्रपटाच्या कथेपेक्षा नक्कीच कमी नाही.

3 / 8

त्याची प्रेमकहाणी खूप रोमांचक आहे. ईशांतने एका मुलाखतीत सांगितले की, त्याची पत्नी प्रतिमा सिंग हिला त्याने जेव्हा पहिल्यांदा पाहिले, त्याच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. ईशांतची भावी पत्नी प्रतिमा भारताच्या महिला बास्केटबॉल संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक होती.

4 / 8

बास्केटबॉल स्पर्धेत ईशांत पहिल्यांदा प्रतिमाला भेटला होता. त्यावेळी ईशांत कार्यक्रमाचा 'प्रमुख पाहुणा' म्हणून गेला होता. ईशांतने प्रतिमाला पाहिले अन् पहिल्याच भेटी तो तिच्या प्रेमात पडला.

5 / 8

मूळची वाराणसीची असलेली प्रतिमा पाच बहिणींपैकी सर्वांत लहान बहीण. प्रतिमाच्या सर्व बहिणीदेखील बास्केटबॉल खेळाडू होत्या. त्यापैकी चौथ्या क्रमांकाची बहिण आकांक्षा ही ईशांतची वर्गमैत्रिण होती.

6 / 8

ईशांतने कार्यक्रमात आकांक्षाला जुनी ओळख सांगितली आणि हळूहळू प्रतिमाची माहिती काढली. लग्न करेन तर याच मुलीशी... असा मनात ईशांतने निर्णय घेऊन टाकला होता.

7 / 8

पण स्वभावाने खूपच लाजाळू असल्याने आपल्या भावना प्रतिमाला कशा सांगावा, या विचारात तो अडकून पडला. प्रतिमाच्या पुढ्यात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याला खूपच वेळ लागला. आपली 'मन की बात' तिला स्पष्टपणे सांगण्याची हिंमत तो करू शकत नव्हता.

8 / 8

अखेर वर्षभराने त्याने तिच्याशी डेटिंग सुरु केले आणि मग प्रतिमाला प्रपोज केले. २०११ मध्ये पहिल्यांदा भेटलेले ईशांत अन् प्रतिमा ९ डिसेंबर २०१६ ला विवाहबंधनात अडकला. नोव्हेंबर २०२३ मध्ये ईशांत-प्रतिमा आई बाबा झाले.

टॅग्स :इशांत शर्मादिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टबास्केटबॉललग्नभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ