Join us

"नवऱ्याला गुडबाय म्हणायची वेळ.."; क्रिकेटरच्या पत्नीची पोस्ट, नेटकरी म्हणे- आणखी एक घटस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:55 IST

Open in App
1 / 10

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा जोडीच्या घटस्फोटाची बातमी अगदी ताजी आहे. त्याआधी हार्दिक पांड्या, शिखर धवन, मोहम्मद शमी यांचेही घटस्फोट झाले आहेत.

2 / 10

भारतीय क्रिकेटमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अचानक भरपूर वाढल्याचे गेल्या काही वर्षात स्पष्टपणे दिसून येत आहे. मनीष पांडे-आश्रिता शेट्टी जोडीबाबतही चर्चा सुरु आहे.

3 / 10

अशातच आज सोशल मीडियावर एका माजी भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीने एक पोस्ट केली आहे. यातील कॅप्शनच्या सुरुवातीच्या शब्दांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

4 / 10

माजी क्रिकेटर आणि लोकप्रिय समालोचक आकाश चोप्रा याची पत्नी आक्षी चोप्रा हिने केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत असून लोकांनी त्यावर कमेंट्स केल्यात.

5 / 10

आकाश चोप्राच्या पत्नीचे नाव आक्षी माथूर-चोप्रा. ती फॅशन स्टायलिस्ट आहे. आकाश-आक्षी या दोघांचे लग्न २००९ साली झाले असून उभयतांना दोन मुली आहेत.

6 / 10

आक्षी चोप्रा खूपच प्रतिभावान आहे. तिचा स्वत: कस्टमाईज्ड साबण बनवण्याचा व्यवसाय आहे. ELEVEN11_soapery असे आक्षी चोप्राच्या ब्रँडचे नाव आहे.

7 / 10

एका जुन्या मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिला क्रिकेट सामने पाहणे आणि आकाश चोप्राची कॉमेंट्री आवडते. पण आज ती वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.

8 / 10

आक्षी चोप्राने आज आकाश चोप्रासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोसोबत तिने लिहिलेल्या कॅप्शनमध्ये सुरुवातीलाच, नवऱ्याला गुडबाय केले आहे.

9 / 10

तिने फोटो पोस्ट करून लिहिले आहे, 'माझ्या नवऱ्याला गुडबाय म्हणायची वेळ आलीय... पण हे गुडबाय तात्पुरते आहे. मी त्याला IPL साठी जाऊ देतेय, लवकरच भेटूया.'

10 / 10

या पोस्टचा सुरुवातीचा मजकूर वाचून अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये म्हटले आहे की, हे पाहून वाटले आणखी एक घटस्फोटाची बातमी आली. पण सुदैवाने तसे नाहीये.

टॅग्स :घटस्फोटऑफ द फिल्डभारतीय क्रिकेट संघव्हायरल फोटोज्इन्स्टाग्राम