दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात प्रथमच सलामीला येत रोहित शर्मानं बरेच विक्रम नावावर केले. त्यानं दोन्ही डावांत शतकी खेळी करताना भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. एकाच कसोटीत सर्वाधिक 300+ धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत रोहितनं एन्ट्री घेतली, परंतु त्याला Fabulous five मधील प्रवेश अवघ्या दोन धावांनी हुकला.
सुनील गावस्कर 344 धावा ( 124 आणि 220) वि. वेस्ट इंडिज 1971
व्हीव्हीएस लक्ष्मण 340 धावा ( 59 आणि 281 ) वि. ऑस्ट्रेलिया 2001
सौरव गांगुली 330 धावा ( 239 आणि 91) वि. पाकिस्तान 2007
विरेंद्र सेहवाग 319 धावा वि. दक्षिण आफ्रिका ( 2008) आणि 309 धावा वि. पाकिस्तान ( 2004)
राहुल द्रविड 305 धावा ( 233 आणि 72) वि. ऑस्ट्रेलिया 2004
रोहित शर्मा 303 धावा ( 176 आणि 127) वि. दक्षिण आफ्रिका 2019