Join us

IND vs SL, Team India: टीम इंडियाने केलं 'लंकादहन'; या Top 5 शिलेदारांमुळे भारताने साकारला मालिका विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 23:35 IST

Open in App
1 / 6

IND vs SL, Team India: भारताने वर्षाची सुरूवात टी२० मालिका विजयाने केली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील युवा खेळाडूंनी भारताला श्रीलंकेवर विजय मिळवून दिला. भारताने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत श्रीलंकेचा २-१ असा पराभव केला. या मालिकेत अनुभवी खेळाडूंसोबतच अनेक नवे खेळाडूही चमकले. पाहूया या मालिका विजयाचे Top 5 हिरो-

2 / 6

मालिकेत सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सर्वोत्कृष्ट T20 फलंदाज असल्याचे सिद्ध केले. तिसऱ्या सामन्यात त्याने शतक ठोकले तर दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने तीन सामन्यांमध्ये १७० धावा केल्या आणि त्याने ८५च्या सरासरीने आणि १७५च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या.

3 / 6

अक्षर पटेलला (Axar Patel) 'प्लेअर ऑफ द सिरीज' म्हणून गौरविण्यात आले. टीम इंडियासाठी तो किती उपयुक्त ठरू शकतो हे त्याने अष्टपैलू कामगिरी करत दाखवून दिले. अक्षरने तीन सामन्यांत एका अर्धशतकासह एकूण ११७ धावा केल्या. त्याचबरोबर तीन सामन्यांत तीन विकेट्सही घेतल्या.

4 / 6

उमरान मलिक (Umran Malik) हा आणखी एक खेळाडू, ज्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मलिक या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने तीन सामन्यांत सात विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्यांची इकॉनॉमी ९.६३ होती.

5 / 6

कर्णधार हार्दिक पांड्यानेही (Hardik Pandya) या मालिकेत शानदार कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. पांड्याने मालिकेत दोन विकेट्स घेत ४५ धावा केल्या. पण मालिकेत त्याने प्रभावी नेतृत्व केले आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला.

6 / 6

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार हिरो असला तरी भारताच्या डावाला गती मिळवून देण्याचे काम राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) केले. पहिल्या सामन्यात त्याला लवकर बाद व्हावे लागले. पण आज इशान लवकर बाद झाल्यावर स्विंग होणाऱ्या चेंडूवर राहुल चाल करून गेला. त्याने १६ चेंडूत ३५ धावा कुटल्या. त्यात ५ चौकार आणि २ षटकार होते. त्याची खेळी डावाला पुढे घेऊन जाण्यात महत्वाची ठरली.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासूर्यकुमार अशोक यादवहार्दिक पांड्याअक्षर पटेलभारतीय क्रिकेट संघ
Open in App