टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या टी२० मालिका सुरु आहे.
सध्या ही मालिका १-१ अशा बरोबरीत असून रविवारी तिसरा सामना होणार आहे.
याच मालिकेतील एका मिस्ट्री गर्लची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
भारताच्या फलंदाजीच्या वेळी ही सुंदर तरुणी स्क्रीनवर झळकली आणि व्हायरल झाली.
तिलक वर्मा-हार्दिक पांड्या जोडी खेळत या तरुणीची झलक दिसली आणि चर्चा रंगली.
तेव्हापासून ही तरुणी नेमकी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचे उत्तर जाणून घेऊया.
या सुंदर तरुणीचे नाव आहे मेघा शर्मा (Megha Sharma). ती मूळची पंजाबी असून चंदीगडमध्ये राहते.
मेघा ही इन्स्टाग्रामवर खूपच सक्रीय आहे. तिचे तब्बल 119K फॉलोअर्स आहेत.
मेघा अभिनेत्रीदेखील आहे. तिने काही पंजाबी म्युझिक व्हिडीओ केल्या आहेत.
तसेच, मेघा ही कंटेन्ट क्रिएटर आहे. यूट्युबवर तीचे स्वत:चे व्लॉगिंग चॅनल आहे.