IND vs SA 3rd T20 Predicted Playing XI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुरुवारी तिसरा टी२० सामना होणार आहे. ३ सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिया सध्या ०-१ ने पिछाडीवर आहे.
मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या सामन्यातही पावसामुळे खेळाची षटके कमी झाली. आता कर्णधार सूर्यकुमार यादवला शेवटचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची एकमेव संधी आहे.
दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-11 वर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशा स्थितीत टीम इंडियात एका मॅचविनर खेळाडूची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या तिसऱ्या टी२० सामन्यात टीम इंडियामध्ये एक महत्त्वाचा बदल होण्याची दाट शक्यता आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव टी२० मधील अव्वल क्रमांकाच्या गोलंदाजाला संघात स्थान देऊ शकतो.
दुसऱ्या टी२० सामन्यात स्पिनला पोषक खेळपट्टी असूनही T20 चा नंबर १ चा गोलंदाज संघाबाहेर होता. रवी बिश्नोई नुकताच आयसीसी क्रमवारीत नंबर 1 गोलंदाज बनला आहे. अशा स्थितीत आता तिसऱ्या सामन्यात तो पुनरागमन करेल अशी आशा आहे.