नव्या वर्षातील वनडेतील पहिले शतक विराट कोहली किंवा रोहित शर्माच्या भात्यातून येईल, असेच अनेकांना वाटले होते. पण लोकेश राहुलनं पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना हा डाव साधला आहे.
भारताकडून नव्या वर्षात पहिले शतक झळकवताना लोकेश राहुलनं वनडेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनलाही मागे टाकले.
भारताकडून विकेट किपर बॅटरच्या रुपात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत केएल राहुल तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
त्याच्याशिवाय राहुल द्रविडनं विकेटमागची भूमिका बजावताना ४ तर महेंद्रसिंह धोनीनं सर्वाधिक ९ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
एवढेच नाही तर नव्या वर्षातील पहिल्या अन् स्पेशल सेंच्युरीसह लोकेश राहुलनं रनमशिन विराट कोहली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या खास पक्तींत स्थान मिळवले आहे.
लोकेश राहुल हा न्यूझीलंडच्या मैदानासह घरच्या मैदानात किवी संघाविरुद्ध शतकी खेळी करणारा सहावा भारतीय ठरला आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह विराट कोहलीनं किवी संघाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानासह मायदेशात शतक झळावले आहे.
वीरेंद्र सेहवागसह राहुल द्रविड आणि श्रेयस अय्यर यांनी देखील न्यूझीलंड आणि भारतीय मैदानात शतक झळकावले आहे.