IND vs ENG 1st T20: भारताच्या प्लेइंग ११ मधून सुंदरचा 'पत्ता कट'; २१ वर्षीय ऑलराऊंडरला संधी?

Team India Playing XI Prediction, Ind vs Eng 1st T20: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची इंग्लंडविरूद्ध टी२० मालिका

भारतीय संघ आजपासून इंग्लंड विरूद्ध पाच टी२० सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव संघाचा कर्णधार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी संघात हार्दिक पांड्याला देखील संधी मिळाली आहे. मात्र उपकर्णधारपद अक्षर पटेलकडे सोपवण्यात आले आहे.

संघात अनुभवी खेळाडूंसोबतच युवा प्रतिभावान क्रिकेटपटूंनाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळेच प्लेइंग ११ काय असेल त्याची चर्चा आहे.

एका रिपोर्टनुसार, कोलकातामधील पहिल्या टी२०साठी भारतीय संघात केवळ अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्ती या दोन फिरकीपटूंनाच संधी दिली जाईल.

अनुभवी अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला संघाबाहेर ठेवलं जाण्याची शक्यता आहे. इडन गार्डन्सवर पडणारे दव लक्षात घेता तिसरा स्पिनर खेळवला जाणार नाही.

याऊलट, अष्टपैलू खेळाडूची ती जागा भरून काढण्यासाठी २१ वर्षीय नितीश कुमार रेड्डीला संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज बांधला जातोय.