१९७३ मध्ये पहिल्यांदा भरवण्यात आलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह वर्ल्ड इलेव्हन न्यूझीलंड, त्रिनिनाद अँण्ड टोबॅको, जेमिका आणि यंग वूमन इंग्लंड या ७ संघांचा सहभाग होता. रॉबिन राउंड पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत यजमान इंग्लंड संघाने २० गुण मिळवत जेतेपद पटकावले होते. १७ गुणांसह ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर राहिला.
१९७८ मध्ये महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील स्पर्धा ही भारताच्या यजमानपदाखाली झाली. रॉबिन राउंड पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत इंगलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारतीय महिला संघाचा समावेश होता. ६ गुण खात्यात जमा करत ऑस्ट्रेलियन संघाने या हंगामात पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकला होता.
१९९२ मध्ये न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली झालेल्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन महिला संघाने इंग्लंडला पराभूत करत दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली होती.
१९८८ मध्ये ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानात सलग तिसरी वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. यावेळीही त्यांनी इंग्लंडच्या संघाला पराभूत करत बाजी मारली होती.
१९९३ च्या हंगामात इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघात फायनल खेळवण्यात आली. यावेळी इंग्लंडच्या संघाने दुसऱ्यांदा जेतेपदाटचा डाव साधला.
१९९७ मध्ये भारताच्या यजमानपदाखाली कोलकाताच्या मैदानात फायनल सामना खेळवण्यात आला. न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने जेतेपदाचा चौकार मारला होता.
२००० च्या हंगामात न्यूझीलंडच्या संघाने घरऱ्या मैदानात रंगलेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला मात देत पहिली वहिली स्पर्धा गाजवली.
२००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात झालेल्या वनडेतील महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पहिल्यांदा फायनलपर्यंत पोहचला. पण यावेळी या स्पर्धेत दबदबा असणारा ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या विजयाआड आला. त्यांनी पाचव्यांदा ही स्पर्धा गाजवली.
२००९ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मैदानात रंगलेल्या स्पर्धेत इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडला पराभूत करत आणखी एका वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले होते. १०१३ ला पुन्हाऑस्ट्रेलिया, २०१७ मध्ये इंग्लंड आणि गत हंगामात पुन्हा ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा गाजवली होती. २०१७ मध्ये दुसऱ्यांदा भारतीय संघ या स्पर्धेत फायनल खेळला. पण इंग्लंडच्या संघासमोर भारतीय संघाला उप विजेतेदावरच समाधान मानावे लागले.