दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने नामिबियाला पराभूत करत अनेक विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय संघाने नामिबियाला ९३ धावांनी पराभूत केले. टी २० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाचा हा सर्वात मोठा विजय ठरला. याआधी २०१२ च्या हंगामात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध ९० धावांनी विजय नोंदवला होता.
याआधी हा विक्रम नेदरलँडसच्या नावे होता. त्यांनी आयर्लंडविरुद्ध अवघ्या ४२ चेंडूत शंभर धावा केल्या होत्या. टीम इंडियाने हा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
याआधी हा विक्रम नेदरलँडसच्या नावे होता. त्यांनी आयर्लंडविरुद्ध अवघ्या ४२ चेंडूत शंभर धावा केल्या होत्या. टीम इंडियाने हा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. यात संजूनं ८ चेंडूत केलेल्या २२ धावांचे योगदानही आहे.
भारतीय संघाने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात २०९ धावा केल्या. टीम इंडियाने २७ व्या वेळी २०० धावांचा आकडा पार केला आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या तर न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. या संघांनी अनुक्रमे २९ आणि २८ वेळा अशी कामगिरी केली आहे.
भारतीय संघाचा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सलग दहावा विजय ठरला. २०२४ च्या वर्ल्ड टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून सुरु झालेला विजयी सिलसिला कायम राखत टीम इंडियाने हा वर्ल्ड रेकॉर्ड आणखी भक्कम केला आहे.
ईशान किशनने या सामन्यात यंदाच्या हंगामातील दुसरे आणि भारताकडून वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचवे जलद अर्धशतक झळकावले. ऑलटाइम रेकॉर्ड युवराज सिंगच्या नावे आहे. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत युवराजनं इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
जसप्रीत बुमराहच कमबॅक ही टीम इंडियासाठी सकारात्मक गोष्ट ठरली. त्याने चार षटकांचा कोटा पूर्ण करताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी एक विकेटही घेतली.
सूर्या दादाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपला विजयी सिलसिला कायम ठेवत पाकिस्तानला पुन्हा एकदा धक्का देण्यासाठी तयार आहे. १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना रंगणार आहे.
नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजीशिवाय क्षेत्ररक्षणातही सर्वोत्तम दर्जा दाखवून दिला. पुढच्या सामन्यात ही गोष्टही टीम इंडियासाठी जमेची बाजू ठरेल.