T20 World Cup 2026 Final: रविवार, ०८ मार्च २०२६ रोजी T20 World Cup ची फायनल मॅच होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. या मॅचबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ही मॅच जिंकून पुन्हा एकदा एक मोठा इतिहास घडवण्यासाठी संधी टीम इंडियाकडे आहे.
T20 World Cup Final 2026: अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष या मॅचकडे लागलेले असताना भारतीय रेल्वेही सज्ज झाली आहे. या मॅचसाठी अहमदाबादला जाता यावे, यासाठी रेल्वेकडून १२ विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि पुणे या ठिकाणाहून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. या १२ ट्रेनची सविस्तर माहिती एका क्लिकवर जाणून घ्या...
Indian Railway Special Train For T20 World Cup 2026 Final: ट्रेन क्रमांक ०९०२७ मुंबई सेंट्रल - अहमदाबाद स्पेशल शनिवार, ०७ मार्च २०२६ रोजी रात्री २३:४५ वाजता मुंबई सेंट्रलवरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ०७ मार्च २०२६ रोजी सकाळी ०८:३० वाजता अहमदाबादला पोहोचेल. या ट्रेनना फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर क्लासचे कोच असतील.
Indian Railway Special Train Time Table For T20 World Cup Final 2026: ट्रेन क्रमांक ०९०२८ अहमदाबाद - मुंबई सेंट्रल स्पेशल सोमवार, ०९ मार्च २०२६ रोजी ०३.०० वाजता अहमदाबादहून निघेल आणि त्याच दिवशी ११.१५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, भरूच आणि वडोदरा स्थानकांवर थांबेल.
ट्रेन क्रमांक ०९०२१ मुंबई सेंट्रल - अहमदाबाद स्पेशल रविवार, ०८ मार्च २०२६ रोजी सकाळी ६:२० वाजता मुंबई सेंट्रलहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.४० वाजता अहमदाबादला पोहोचेल. या ट्रेनला विस्टाडोम, एक्झिक्युटिव्ह अनुभूती, एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि एसी चेअर कार कोच असतील.
ट्रेन क्रमांक ०९०२२ अहमदाबाद - मुंबई सेंट्रल स्पेशल रविवार, ०८ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.१० वाजता अहमदाबादहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री २१.४५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, भरूच आणि वडोदरा स्थानकांवर थांबेल.
ट्रेन क्रमांक ०९०२९ वांद्रे टर्मिनस-अहमदाबाद स्पेशल ०८ मार्च २०२६ रोजी ००.०५ वाजता (म्हणजेच शनिवार, ०७ मार्च रोजी रात्रौ १२ वाजून ०५ मिनिटांनी) वांद्रे टर्मिनस येथून निघेल आणि त्याच दिवशी सकाळी ०८:४० वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टियर आणि एसी ३-टियर कोच असतील.
ट्रेन क्रमांक ०९०३० अहमदाबाद-वांद्रे टर्मिनस स्पेशल ०९ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री ०३.२० वाजता (म्हणजेच रविवारी ०८ मार्च रोजीच्या रात्री ०३ वाजून २० मिनिटे) अहमदाबाद येथून निघेल आणि त्याच दिवशी सकाळी ११.३५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. ही ट्रेन बोरिवली, वापी, सुरत, भरूच आणि वडोदरा स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल.
ट्रेन क्रमांक ०९०४३ वांद्रे टर्मिनस-अहमदाबाद स्पेशल ही सोमवार, ०९ मार्च २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता वांद्रे टर्मिनस येथून निघेल आणि त्याच दिवशी २२.५५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये एसी ३-टायर कोच असतील.
ट्रेन क्रमांक ०९०४४ अहमदाबाद-वांद्रे टर्मिनस स्पेशल ही ०९ मार्च २०२६ रोजी ३.५० वाजता अहमदाबाद येथून निघेल आणि त्याच दिवशी १२.१५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. ही ट्रेन दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, भरूच आणि वडोदरा स्थानकांवर थांबेल.
ट्रेन क्रमांक ०११५४ अहमदाबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल ही ट्रेन सोमवार, ०९ मार्च २०२६ रोजी पहाटे ४.०० वाजता अहमदाबादहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये एसी ३-टायर (इकॉनॉमी) कोच असतील.
ट्रेन क्रमांक ०११५३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अहमदाबाद स्पेशल ही ट्रेन शनिवारी, ०७ मार्च २०२६ रोजी रात्री २२.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. ही ट्रेन दोन्ही दिशांना वडोदरा, सुरत, वसई रोड, ठाणे आणि दादर स्थानकांवर थांबेल.
ट्रेन क्रमांक ०१४१८ अहमदाबाद-पुणे स्पेशल ही ट्रेन सोमवार, ०९ मार्च २०२६ रोजी २.०० वाजता अहमदाबादहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.१० वाजता पुण्यात पोहोचेल. या ट्रेनमध्ये एसी २-टियर, एसी ३-टियर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लासचे डबे असतील.
ट्रेन क्रमांक ०१४१७ पुणे-अहमदाबाद स्पेशल ही ट्रेन शनिवारी, ०७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता अहमदाबादला पोहोचेल. ही ट्रेन दोन्ही दिशांना वडोदरा, सुरत, वसई रोड, कल्याण आणि लोणावळा स्थानकांवर थांबेल.
मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पुणे येथून सुटणाऱ्या सर्व ट्रेनची सविस्तर माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ट्रेनचे थांबे, वेळा आणि कोच रचना याबद्दल तपशीलवार माहितीसाठी प्रवाशांनी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.