Photo : रजनीकांतसारखे शेजारी सोडून भारतीय क्रिकेटपटू नव्या घरी शिफ्ट झाला

Dinesh Karthik New House Pictures: भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक याने नवीन घर खरेदी केलं आहे. कार्तिक संघाबाहेर असला तरी तो नेहमी चर्चेत असतो. तो सध्या समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहे आणि आयपीएलमध्ये RCB कडून खेळतो.

नुकताच त्याने इंस्टाग्रामवर नव्या घर खरेदीची बातमी चाहत्यांना दिली. त्याने गृह प्रवेशाचे काही फोटो पोस्ट करून ही बातमी दिली. यावेळी दिग्गज स्क्वॉशपटू व त्याची पत्नी दीपिका पल्लीकलही सोबत होती. या जोडप्याने पूर्ण विधी करून आपल्या नवीन घरात प्रवेश केला. यापूर्वी दिनेश कार्तिक हा सुपरस्टार रजनीकांत यांचा शेजारी होता.

दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांनी २०१५ मध्ये लग्न केले. पहिल्या पत्नीकडून फसवणूक झाल्यानंतर दिनेश दुसरी पत्नी दीपिकासोबत सुखी जीवन जगत आहे.

दिनेश कार्तिकने गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले की ही एक नवीन सुरुवात आहे व आठवणी ताज्या करण्यासाठी.

दिनेशने कसोटी क्रिकेटमध्ये २६ सामन्यांत १०२५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने १ शतक आणि ७ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याने ९४ वन डे सामन्यांत १७५२ धावा केल्या. T20I मध्ये कार्तिकने ६० सामने खेळताना ६८६ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये दिनेशने २४२ सामने खेळताना ४५१६ धावा केल्या आहेत.

दीपिका ही जागतिक स्क्वॉश क्रमवारीत अव्वल १० मध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय खेळाडू होती. तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरी गटात दोन सुवर्ण, १ रौप्य व २ कांस्टपदकांची केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने दुहेरीचे १ सुवर्ण, दोन रौप्य व १ कांस्टपदक जिंकले.