Join us
Daily Top 2Weekly Top 5

WPL 2026 : भाव न मिळालेली सुंदरी आता 'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीमुळे चर्चेत; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 19:40 IST

Open in App
1 / 10

महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामातील स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात पोहचली असताना मेगा लिलावात निराशा पदरी आलेल्या वैष्णवी शर्माच नशीब चमकले आहे.

2 / 10

WPL च्या मेगा लिलावात अनसोल्डचा टॅग लागलेल्या वैष्णवी शर्माची मुंबई इंडियन्सच्या संघात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. त्यामुळे टीम इंडियातील ही सुंदरी चर्चेत आली आहे.

3 / 10

डावखुऱ्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या वैष्णवी शर्माला WPL लिलावात पाच पैकी एकाही फ्रँचायझी संघाने भाव दिला नव्हता. पण हे अपयशानंतर तिला टीम इंडियाची लॉटरी लागली.

4 / 10

घरच्या मैदानातील श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघातून तिने पदार्पण केले.

5 / 10

पदार्पणाच्या पहिल्या लढतीत विकेट लेस राहिल्यावर तिने पाच सान्यांच्या मालिकेत संयुक्तरित्या सर्वाधिक विकेट्स घेत श्रीलंकेविरुद्धची मालिका गाजवली.

6 / 10

या कामगिरीनंतर आता ती हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील WPL फ्रँचायझी टी-२० क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.

7 / 10

जी. कमलिनी दुखापतीमुळे WPL च्या यंदाच्या हंगामातून बाहेर पडली आहे. तिच्या जागी मुंबई इंडियन्सनं वैष्णवी शर्मासाठी 'ही पोरी कोणाची...ही पोरी मुंबई इंडियन्सची' हे यंदाच्या हंगामासाठीचे खास गाणं वाजवलं आहे.

8 / 10

दोन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या संघाने ३० लाख या मूळ किंमतीही तिला संघात घेतले आहे. उर्वरित तिला किती संधी मिळणार? यात ती कशी छाप सोडणार ते पाहण्याजोगे असेल.

9 / 10

भारतीय महिला संघाकडून पदार्पण केल्यावर वैष्णवी शर्मानं कर्णधार हरमनप्रीत कौरसह खास सेलिब्रेशनमुळे मैफिल लुटली होती.

10 / 10

WPL च्या यंदाच्या हंगामात या दोघींच्यातील खास बाँडिंग आणि सेलिब्रेशनचा खास नजारा किती वेळा पाहायला मिळणार तेही लक्षवेधी असेल.

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगमुंबई इंडियन्सभारतीय महिला क्रिकेट संघहरनमप्रीत कौर