भारताचा युवा स्फोटक बॅटर अभिषेक शर्मा याने टी-२० क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करून दाखवली. छोट्या फॉरमॅटमध्ये त्याने मोठा धमाका करताना अनेक विक्रम मोडीत काढले.
२०२५ या वर्षात कॅलेंडर ईयरमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा डाव त्याने साधला. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही. परिणामी किंग कोहलीचा ऑलटाइम विक्रम मोडण्याची त्याची मोठी संधी हुकली आहे.
इथं एक नजर टाकुयात २०२५ या वर्षात टी-२० मध्ये धमाका करणाऱ्या अभिषेक शर्मासह एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या खास रेकॉर्ड्सवर...
भारताकडून टी-२० मध्ये एका वर्षांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली सर्वात आघाडीवर आहे. २०१६ च्या हंगामात त्याने टी-२० मध्ये १६१४ धावा केल्या होत्या.
अभिषेक शर्माला किंग कोहलीला मागे टाकण्याची संधी होती. त्याने १६०० धावांचा पल्ला गाठला. यंदाच्या वर्षात त्याने १६०२ धावा करत तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते. कोहलीचा 'विराट' विक्रम मोडण्यापासून तो अवघ्या १३ धावांनी चुकला.
यंदाच्या कॅलेंडर ईयरमध्ये (२०२५) सर्वात खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या भारताच्या टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवनं १५०३ धावांसह २०२२ हे वर्ष गाजवलं होते.
२०२३ हे वर्षही सूर्यकुमार यादवनं गाजवलं होते. या वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १३३८ धावा केल्या होत्या.
यशस्वी जैस्वाल याने २०२३ या वर्षात खास कामगिरी करताना टी-२० क्रिकेटमध्ये १२९७ धावा केल्या होत्या.