भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा पत्नी धनश्री वर्मा हिच्यापासून वेगळा होत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांमध्ये सुरू आहेत
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघेही कोविड काळात एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांनी झटपट विवाह देखील केला मात्र चार वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर ते आता विभक्त होत असल्याच्या चर्चा सगळीकडेच रंगत आहेत
युजवेंद्र चहल हा भारतीय संघातून बराच काळापासून बाहेर आहे तशातच वैयक्तिक आयुष्यात त्याला घटस्फोटाचा सामना करावा लागत असल्याने चाहते त्याच्याप्रती सहानुभूती व्यक्त करताना दिसतात
नेमके प्रकरण काय आहे याबाबत कुठलीही कल्पना नसताना चहलची पत्नी धनश्री वर्मा हिच्या वर सातत्याने चाहत्यांकडून टीका केली जाते
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे आयुष्यातील मार्ग वेगवेगळे आहेत हे आता जवळपास निश्चित झाले आहे पण त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही
घटस्फोटाबाबत सोशल मीडियावर किंवा प्रसार माध्यमांमध्ये कितीही चर्चा झाली अथवा विचारणा झाली तरीही त्यावर व्यक्त व्हायचे नाही असे दोघांकडूनही दिसून येत आहे
अशा परिस्थितीत धनश्री वर्मा हिने कोणतीही सोशल मीडिया पोस्ट केली की त्यावर सहल चे चाहते व्यक्त होताना दिसतात आणि तिच्यावर टीका करतात
धनश्री ही लोकप्रिय डांसर असून काही रियालिटी शोमध्ये ही झळकली आहे त्यामुळे सेलिब्रिटी स्टेटस असलेल्या धनश्रीला सोशल मीडियावर मात्र खालच्या पातळीच्या टिकेचा सामना करावा लागतो
या टीकेला कंटाळून काही दिवसांपूर्वी धनश्रीने आपल्या इन्स्टा स्टोरीवर याबाबत नाराजी व्यक्त करणारा संदेश लिहिला होता पण अद्यापही टीका थांबताना दिसत नाही
आता धनश्रीने केलेल्या ताज्या फोटोशूट मध्ये तिने फोटोंसोबत एक कॅप्शन जोडले आहे त्या कॅप्शनमध्ये हे रूप म्हणजे सामर्थ्य आणि सौंदर्याचे पोर्ट्रेट असल्याचे तिने म्हटले आहे
एकीकडे चहात्यांची टीका सुरूच असताना दुसरीकडे चहलदेखील या प्रकारावर कोणतेही भाष्य करत नसल्याने पोस्टमधील संदेश नेमका कुणाला, याबाबत नवी चर्चा रंगताना दिसत आहे