चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला आता एक आठवड्यापेक्षाही कमी दिवस शिल्लक आहेत. या स्पर्धेपूर्वी काही महत्त्वाच्या वेगवान गोलंदाजांनी विविध कारणांनी माघार घेतली आहे. पाहूया त्यांची यादी.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेत दुखापत झाली होती. त्यातून तो अद्याप सावरला नसल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यानेही स्पर्धेतून माघारी घेतली आहे. भारता विरूद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या दुखापतीमुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागला.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया यानेही स्पर्धेतून माघार घेतली आहे. सुरुवातीला तो संघाचा भाग होता, पण पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने त्याला स्पर्धेबाहेर व्हावे लागले.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याने कमरेच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याला कसोटी मालिकेतच दुखापत झाली होती.
मिचेल स्टार्कनेही स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. गेल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत स्टार्कने फक्त चार षटके टाकली. त्याच्या डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे त्याने माघार घेतली आहे.
आफ्रिकन वेगवान गोलंदाज गेराल्ड कोइत्झे यानेही स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. जानेवारी महिन्यात तो स्नायूंच्या दुखापीतने त्रस्त होता. त्यातून लगेच सावरू शकत नसल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतली.