Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

Asia Cup Final 2025: रविवारी २८ सप्टेंबर २०२५ रोजी आशिया चषक स्पर्धेची अंतिम फेरी आहे. या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत.

Asia Cup Final 2025: आशिया चषक स्पर्धेत रविवारी अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पुन्हा एकदा सामना पाकिस्तान क्रिकेट संघाशी होणार आहे. बांगलादेशला हरवून पाकिस्तानने गुरूवारी अंतिम फेरीचे तिकीट मिळवले.

Asia Cup Final 2025 Astrology Prediction: तर शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये मात केली. आशिया चषक स्पर्धेत तिसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. यापूर्वी दोन्ही वेळेस भारताने सामने जिंकून आम्हीच बाप असल्याचे सिद्ध केले. अंतिम सामन्यात पाकिस्तानवर दडपण असणार आहे. भारतालाही लय कायम राखण्यासाठी गाफील राहून चालणार नाही.

Asia Cup Final 2025 नेमके कोण जिंकणार, याकडे केवळ क्रिकेटप्रेमींचे नाही, तर जगाचे लक्ष लागले आहे. परंतु, एकूण ग्रहस्थिती पाहता, आशिया चषक कोण जिंकेल, याबाबत काही ज्योतिषांनी मोठी भविष्यवाणी केल्याचे म्हटले जात आहे.

२८ सप्टेंबरला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात हे दोन संघ भिडणार आहे. भारतीय संघ नवव्यांदा जेतेपदावर नाव कोरण्यास सज्ज आहे. दुसरीकडे, २८ तारखेचा आकडा पाहून पाकिस्तानला घाम फुटला आहे. कारण यापूर्वी २८ तारखेला खेळलेल्या दोन सामन्यात भारताने पाकिस्तानला धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानची धाकधूक आतापासूनच वाढली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा अंतिम सामना २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. रात्री ८ वाजता मेष लग्न असणार आहे. शुक्र आणि केतु पाचव्या स्थानी आहेत. सूर्य आणि बुध सहाव्या स्थानी, मंगळ सातव्या, चंद्र आठव्या, राहु अकराव्या आणि शनि बाराव्या स्थानी आहेत.

या परिस्थितीत, शुक्र, केतु आणि राहु यांच्या स्थिती हे दर्शवतात की, हा सामना अनेक बाबतीत चिंताजनक असू शकतो. Suryakumar Yadav च्या कुंडलीनुसार, त्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ चांगली कामगिरी करत आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात भारताकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

Abhishek Sharmaची कुंडली वृषभ लग्नाची आहे. शनि आणि केतु सहाव्या स्थानी आहेत. या स्थानामुळे तो अत्यंत आक्रमक होऊ शकतो. परंतु, आक्रमकपणा ही उतावीळ कृती ठरू शकतो. अभिषेकला या सामन्यात थोडे अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या गाफील क्षणी लहानशी चूक महागात पडू शकते. त्यातून अभिषेक शर्मा तारला गेला, तर तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकेल.

स्टार फलंदाज Abhishek Sharma आणि Shubman Gill भारताकडून चमकदार कामगिरी करत आहेत. दरम्यान, पाकिस्तानकडून खेळणारा साहिबजादा फरहानने बॅटने आणि शाहीन शाह आफ्रिदीने बॉलने आपली छाप पाडली आहे.

Shubman Gill आणि Tilak Varma आशिया कपच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही खेळाडूंसाठी मंगळ आणि गुरु ग्रहाचे स्थान मजबूत, सकारात्मक आहे. त्यांच्या खेळीमुळे भारताला मोठ्या विजयाचे संकेत मिळत आहेत.

आशिया कपमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारा कुलदीप यादवही अंतिम सामन्यात छाप पाडू शकेल. केतुच्या प्रभावामुळे अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर सर्वांचे लक्ष असेल. आतापर्यंत त्याची कुंडली सकारात्मक संकेत देत असली तरी, मैदानावर सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल.

ज्योतिषशास्त्रानुसार, आशिया कपमधील टीम इंडियाच्या कामगिरीवर ग्रहांचा प्रभाव पडणार आहे. हा सामना अतितटीचा होईल, असा दावा ज्योतिषांकडून केला जात आहे. पण टीम इंडियावर ग्रहांचा अनुकूल परिणाम होताना दिसत आहे. असे असले तरी भारत शेवटी विजयी होताना दिसतो, कारण गुरु आणि मंगळाची स्थिती स्पष्टपणे भारताच्या विजयाचे संकेत देते, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, भारताने आशिया कप स्पर्धेत नऊ वेळा जेतेपद मिळवले आहे. तर पाकिस्तानने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरले आहे. पाकिस्तानने दोन वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे या स्पर्धेतही भारताचे पारडे जड आहे. इतकेच काय भारताने पाकिस्तानला साखळी आणि सुपर ४ फेरीतही पराभवाची धूळ चारली आहे. आता तिसऱ्यांदा पराभूत करण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.