अथिया शेट्टी आणि भारतीय संघाचा क्रिकेटपटू लोकेश राहुल सध्या खूप चर्चेत आहेत. अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाच्या बातम्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अलीकडेच एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
न्यू इयर पार्टीमध्ये अथिया शेट्टी काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये अथिया शेट्टी खूपच सुंदर दिसत होती. तिने भावी पतीसोबत रोमँटिक पोजमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये केएल राहुल देखील अथिया शेट्टीसोबत दिसत आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचे नववर्षातील फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.
नवर्षाच्या पार्टीमध्ये अथिया शेट्टी आपल्या मित्रांसोबत मस्ती करताना पाहायला मिळत आहे. अथिया शेट्टीने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय संघ उद्यापासून श्रीलंकेविरूद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. मात्र, श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेनंतर राहुल बीसीसीआयकडे सुट्टी मागणार असल्याचे बोलले जात आहे.
अथिया शेट्टीचे हे फोटो न्यू इयर पार्टीचे आहेत. या पार्टीत अथिया शेट्टी तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहे.
या फोटोमध्ये अथिया शेट्टी केएल राहुलसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
या फोटोमध्ये अथिया शेट्टी शॉपिंग करताना दिसत आहे. अथियाचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टी या वर्षात लग्न करणार आहेत.
रिपोर्ट्सनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. भारतीय संघ श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेनंतर मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध मालिका खेळणार आहे. त्यामुळे राहुल बीसीसीआयकडे सुट्टी मागतो का हे पाहण्याजोगे असेल.