पांड्याचा 'कॅरेबियन' स्वॅग; गिलच्या चेहऱ्यावर गंभीर भाव! टीम इंडियातील खेळाडूंचा दुबईतील Look

BCCI नं शेअर केलेले दुबईच्या मैदानातील भारतीय क्रिकेटर्सची खास झलक दाखवणारे फोटो

भारतीय संघातील स्टार अन् स्टायलिश क्रिकेटर हार्दिक पांड्या आशिया कपसाठी नव्या अंदाजात तयार झालाय. कॅरेबियन खेळाडू हेअर स्टाईलसंदर्भात जो छंद जोपातात त्या तोऱ्यात पांड्या दुबईला पोहचलाय.

टीम इंडियाच्या दुबईतील ICC अकादमीतील सरावा वेळीचे काही फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत अकाउंटवरून शेअर केले आहेत. यात हार्दिक पांड्याचा कॅरेबियन स्वॅग सर्वांचे लक्षवेधून घेणारा ठरतोय.

दिल्ली प्रिमीयर लीगच्या फायनलमध्ये कोच गौतम गंभीरनं ज्या शुबमन गिलला स्टायलिश क्रिकेटरचा टॅग दिला. तो गंभीर नेट प्रॅक्टिसमध्ये चेहऱ्यावरील गंभीर मुद्रेसह स्पॉट झाला.

तिलक वर्मा हा देखील टीम इंडियातील स्टायलिश क्रिकेटर्सपैकी एक आहे. दुबईत प्रॅक्टिस वेळी त्याचीही खास झलक पाहायला मिळाली. मार्चमध्ये या युवा क्रिकेटरनं Aalim Hakim या सेलिब्रिटी हेअर स्टायलिशकडून हेअर स्टाईलिंगसह एक नवा लूक मिळवला आहे. सेम हेअर स्टाइल विथ डिफरंट कलर असा बदल त्याच्या लूकमध्ये दिसून येतो.

स्टाईलच्या बाबतीत अभिषेक शर्माही कमी नाही. पण प्रॅक्टिस सेशमध्ये गळ्यात एकदम नाजूक चेन अन् कॅपवर सनग्लासेससह तो सिंपल स्टयशिल लूकमध्ये मिरवताना दिसला.

भारतीय संघाच्या ताफ्यातील दोन स्टार फिरकीपटू एकदम परफेक्ट बियर्ड लूकमध्ये दिसतात.

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने प्रॅक्टिस जर्सीत सनग्लासेस घालून दाखवलेला लूकही एकदम कडक आहे.

दुबईतील प्रॅक्टिस सेशन वेळी रिंकू सिंह, नितीश राणा अन् संजू सॅमसन यांची BCCI नं दाखवलेली झलकही एकदम खासच आहे.

अर्शदीप सिंग नेटमध्ये 'पंजा' मारल्यावर स्टाईल कशी मारायची याची प्रॅक्टिस करताना दिसून येते.

BCCI नं टीम इंडियाच्या ताफ्यातील खेळाडूंचे जे फोटो शेअर केले आहेत त्यात जसप्रीत बुमराहचीही खास झलक पाहायला मिळते.