Join us

एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे धनश्रीचा सोशल मीडियावर नवा फोटोशूट (Photos)

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:37 IST

Open in App
1 / 7

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा ही जोडी सध्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत आहे.

2 / 7

युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात बिनसलं असून दोघांनी घटस्फोट घेण्याचा टोकाचा निर्णय घेतलाय, अशी चर्चा आहे.

3 / 7

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे कपल विभक्त होणार असल्याचे किस्से चवीचवीने वाचले जात आहेत.

4 / 7

इन्स्टाग्रामवरून दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची गोष्टही बरीच चर्चेत होती. तसेच चहल आणि धनश्री यांनी इन्स्टा स्टोरीतून हिंटही दिल्या होत्या.

5 / 7

याचदरम्यान, धनश्रीने बरेच दिवसांनी एक नवे फोटोशूट पोस्ट केले आहे. नेहमी हॉट आणि बोल्ड लूक असलेल्या धनश्रीचा नवा फोटोशूट वेगळा आहे.

6 / 7

या फोटोशूटमध्ये धनश्रीने बंद गळ्याचा काळा स्वेटशर्ट घातला आहे. त्यावर गोल्डन रंगाच्या बांगड्या घालून काहीसा फ्यूजन लूक साकारला आहे.

7 / 7

याशिवाय तिने पांढऱ्या रंगाचा लेहंगा घालून ब्लॅक अँड व्हाइट थीम साकारली आहे. तिच्या नव्या फोटोशूटवर चाहतेही विविध प्रकारच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.

टॅग्स :युजवेंद्र चहलघटस्फोटइन्स्टाग्रामव्हायरल फोटोज्सोशल मीडिया