Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी चहल आणि धनश्री यांच्या नात्यात कटुता आल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्यानंतर ते दोघे विभक्त होऊ शकतात अशाही चर्चांना उधाण आले होते. एकीकडे धनश्री आणि चहल यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या असताना ते दोघे मात्र या मुद्यावर मौन बाळगून आहेत. याचदरम्यान, काही रिपोर्ट्सनुसार घटस्फोटानंतरयुजवेंद्र चहल धनश्री वर्माला मोठी रक्कम पोटगी ( Alimony Amount ) म्हणून देणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
किती रक्कम दिली जाणार?
दोघेही घटस्फोटांच्या चर्चांना बगल देत सोशल मीडियावर अँक्टिव्ह आहेत. मात्र नुकतीच युजवेंद्र चहलने काही पोस्ट शेअर केल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्या नात्याचा आता शेवट होणार असल्याचे संकेत मिळाल्याचे चाहत्यांचेही मत आहे. आता असे म्हटले जात आहे की घटस्फोटाच्या प्रक्रियेत पोटगी म्हणून युजवेंद्र चहलला धनश्रीला सुमारे ६० कोटी रुपये द्यावे लागू शकतात. कुणीही याची अधिकृत पुष्टी करताना दिसत नाही, पण रिपोर्ट्सच्या आधारावरून या बातम्या दिल्या जात आहेत. दरम्यान, घटस्फोटानंतर चहल धनश्रीला किती कोटी देणार याबद्दलच्या बातम्या येऊ लागल्या असल्या तरीही या दोघांच्यात नेमके काय बिनसले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
चहल-धनश्रीच्या नात्यात ४ वर्षांनी दुरावा
चहल आणि धनश्रीचे डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाले. दोघांनीही त्यांच्या पहिल्या भेटीनंतर लगेचच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, ज्याचा खुलासा त्यांनी एका कार्यक्रमात केला. पण, चहल आणि धनश्रीच्या नात्यात ४ वर्षांनी दुरावा आला आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. चहल हा क्रिकेटपटू तर धनश्री ही डान्सर आणि कोरियोग्राफर आहे. पण कोरोना काळात त्यांचे प्रेम जुळले. लग्नानंतर पहिल्या ३ वर्षात दोघांमधील संबंध खूप चांगले होते. दोघेही प्रत्येक ठिकाणी एकत्र दिसले. पण गेल्या वर्षभरापासून दोघे एकमेकांसोबत दिसणे कमी झाले. तेव्हापासूनच यांच्या नात्यातील दुराव्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. नंतर चहलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून धनश्रीचे फोटो डिलीट केले, तेव्हा त्यांच्यातील नाते अधिकच बिघडले असल्याचे स्पष्ट झाले. मात्र अद्याप या दोघांनीही घटस्फोटावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Web Title: Yuzvendra Chahal will have to give 60 crores alimony to Dhanashree Verma after after divorce says reports
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.