Year Ender 2024: रोहित-संजूसह या भारतीय खेळाडूनं वनडेत केल्या सर्वाधिक धावा

भारतीय संघानं यंदा खूपच कमी वनडे सामने खेळले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 15:49 IST2024-12-20T15:48:30+5:302024-12-20T15:49:06+5:30

whatsapp join usJoin us
Year Ender 2024: See the top 3 batsmen with the most runs in ODIs | Year Ender 2024: रोहित-संजूसह या भारतीय खेळाडूनं वनडेत केल्या सर्वाधिक धावा

Year Ender 2024: रोहित-संजूसह या भारतीय खेळाडूनं वनडेत केल्या सर्वाधिक धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट संघासाठी २०२४ हे वर्ष एकदम खास राहिले. टी-२० वर्ल्ड कप जेतेपदासह क्रिकेटच्या या छोट्या फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा बोलबाला दिसून आला. टी-२० आणि कसोटी सामन्यांच्या तुलनेत यंदाच्या वर्षात टीम इंडियाने मोजके वनडे सामने खेळले. स्टार विकेट किपर बॅटर संजूलाही वनडे संघात संधी मिळाली.  त्याने यावर्षात वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या ३ फलंदाजांच्या यादीत आपली छापही सोडली. एक नजर टाकुयात यंदाच्या वर्षात भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या विक्रमांवर...
 
अक्षर पटेल - ८० धावा


भारतीय क्रिकेट संघातील स्टार ऑल राउंडर अक्षर पटेलसाठी हे वर्ष एकदम खास राहिले. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करून दाखवणाऱ्या अक्षर पटेल याने यंदाच्या वर्षात ४ वनडे खेळल्या. यात २० च्या सरासरीने त्याने ८० धावा केल्या. 
 
संजू सॅमसन- १०८  धावा


टीम इंडियाचा स्टार विकेट किपर बॅटर संजू सॅमसन याने टी-२० शिवाय वनडेतही खास छाप सोडली. टी-२० क्रिकेटमध्ये धावांची बरसात करणाऱ्या संजूला या वर्षात फक्त एक वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने शतकी खेळी करून यंदाच्या वर्षात वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर कब्जा केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात त्याने १०८ धाावांची खेळी केली होती.

रोहित शर्मा १५७ धावा


भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी हे वर्ष खूपच संघर्षमयी राहिले. सातत्याने तो अपयशी ठरताना दिसले. पण वनडेत रोहितनं श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत  ५२.३३ च्या सरासरीने १५७ धावा केल्या आहेत. २०२४ मध्ये वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो सर्वोच्च स्थानी आहे.

Web Title: Year Ender 2024: See the top 3 batsmen with the most runs in ODIs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.