WTC Final 2025 Price Money Announced, Aus vs SA: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५च्या फायनलसाठी BCCI ने नुकतीच बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. गेल्या दोन वर्षात झालेल्या कसोटी सामन्यांमधून सर्वोत्तम दोन संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या यांच्यातील कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामने ११ जून पासून इंग्लंडमधील लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात खेळवला जाणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या दोन्ही हंगामात भारतीय संघ फायनल खेळला. पण त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. यंदा भारत फायनलला पोहोचू शकलेला नाही. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी एकाला यंदाचा कसोटी क्रिकेटमधील मानाची गदा मिळणार आहे. त्यासोबतच भरपूर मोठी बक्षिसाची रक्कम देखील दिली जाणार आहे.
विजेत्याला किती पैसे मिळणार?
ICCचे चेअरमन जय शाह यांनी नुकतीच WTC Final 2025 साठी बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. यंदा ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका यांच्यातील विजेत्या संघाला ३.६ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच, सुमारे ३० कोटी ८० लाख ८९ हजार ८०० रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. तर, उपविजेत्या संघाला २.१ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच, १७ कोटी ९७ लाख ४८ हजार ६६० रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. गेल्या हंगामातील फायनलच्या तुलनेत यंदा विजेत्याच्या बक्षिसात १२५ टक्के तर उपविजेत्याच्या रकमेत १६२ टक्के वाढ करण्यात आली आहे.
---
भारत, पाकिस्तानला किती मिळणार बक्षीस?
विजेता आणि उपविजेत्यांशिवाय, स्पर्धेतील इतर संघांनाही बक्षिस दिले जाणार आहे. तिसऱ्या क्रमांकावरील टीम इंडियाला १.४ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १२ कोटी ३२ लाख ५६ हजार २२४ रुपये मिळणार आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या संघाला १.२ मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १० कोटी २७ लाख १३ हजार ५२० रुपये दिले जाणार आहेत. यादीत सर्वात शेवटी असलेल्या पाकिस्तानला अवघे ०.४८ मिलियन डॉलर्स म्हणजेच ४ कोटी १० लाख ९१ हजार ७०३ रुपये मिळणार आहेत.
![]()
Web Title: WTC Final 2025 Record prize money revealed for World Test Championship Final India vs Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.