World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवसाच्या खेळावरही पावसाचे सावट आहे, परंतु मागील 12 तासांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. सकाळी सूर्यानंही दर्शन दिल्यानं आज खेळ सुरू होण्यास काहीच हरकत नव्हती. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजल्यापासून आजचा खेळ सुरू होणार आहे आणि आताच झालेला नाणेफेकीचा कौल टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या विरोधात गेला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ( New Zealand Elected to ball first)
विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा 61 वा सामना आहे आणि आशियाई कर्णधार म्हणून हा विक्रम आहे. त्यानं महेंद्रसिंग धोनीचा 60 सामन्यांचा विक्रम मोडला.
भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी IND vs NZ World Test Championship
न्यूझीलंडचा संघ - टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विलियम्सन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बी जे वॉटलिंग, कॉलिन डी ग्रँडहोम, टीम साऊदी, कायले जेमिन्सन, ट्रेंट बोल्ट, निल वॅगनर