Join us

हरमनप्रीत कौरनं रिव्हू घेतला अन् मैदानातील अंपायर गडबडली! बॅटरला OUT दिलंय तेच ती विसरली! VIDEO

चूक लक्षात आल्यावर महिला अंपायरचा अंदाज बघण्याजोगा होता.   तिची  रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 23:04 IST

Open in App

क्रिकेटच्या मैदानात फायनल खेळणाऱ्या दोन्ही संघातील खेळाडूंवर दबाव असतो, ही गोष्ट आपण बऱ्याचदा ऐकलीये. पण या सामन्यावेळी अचूक आणि निपक्षपाती  निर्णय देण्यासाठी मैदानात उभारलेले अंपायर्सही त्याला अपवाद नसतात. महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामातील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अंतिम लढतीत तेच दृश्य पाहायला मिळाले. मैदानातील महिला अंपायर अंकिता गुहा पायचितचा निर्णय देताना गडबडल्याचे दिसून आले. चूक लक्षात आल्यावर महिला अंपायरचा अंदाज बघण्याजोगा होता.   तिची  रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

संजनाची विकेट अन् मैदानातील पंच आपण काय निर्णय दिला तेच विसरली 

मुंबई इंडियन्सच्या १६ व्या षटकात टेलिव्हिजन अंपायरमुळे मैदानातील अंपायर गडबडल्याचे पाहायला मिळाले. या षटकात  अमेलिया केरच्या जागी फलंदाजीला आलेली मुंबई इंडियन्सची बॅटर संजना हिने जेस जोनासेन हिच्या अखेरच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. ती फसली अन् यष्टीसमोर सापडली. दिल्लीच्या संघानं पायचितची अपील केल्यावर मैदानातील पंच अंकिता गुहाने बॅटर आउट असल्याचा निर्णय दिला. पण निर्णयावर कायम राहण्याची वेळ आल्यावर अंकिताने बॅटरला नॉट आउट असल्याचा इशारा केला. 

मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौरनं घेतला रिव्ह्यू अन्...

 नॉन स्ट्राइकला असलेल्या हरमनप्रीत कौरनं लगेच रिव्हू घेतला. टेलिव्हिजन महिला अंपायरने यावर अंपाय कॉलचा निर्णय देत मैदानातील अंपायरचा निर्णय कायम ठेवला. पण यावेळी अंपायन अंकिता गुहानं आधी नॉट आउट असा निर्णय दिला अन् मग आपण आधी बॅटरला आउट दिलंय  हे लक्षात आल्यावर पुन्हा बोटवर करत बॅटर आउट असल्याचे सांगितले. ही चूक झाल्यावर महिला अंपायने दिलेली रिअ‍ॅक्शन चर्चेचा विषय ठरत आहे. मूळात टीव्ही अंपायरनं नॉट आउटचा निर्णय कायम ठेवावा अशी चूक केली त्याची पुनरावृत्ती मैदानातील पंचाकडूनही झाली.    

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगहरनमप्रीत कौरमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स