WPL Mega Auction 2026 MI Owner Nita Ambani Along With The Team's Captain Harmanpreet Kaur : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या मेगा लिलाव नवी दिल्लीत पार पडत आहे. या लिलावासाठी मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघाच्या मालकीण नीता अंबानी या टीम इंडियाची वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार हरमनप्रीत कौरसह लिलावासाठी पोहचल्याचे पाहायला मिळाले. हरमनप्रीत कौर ही मुंबई इंडियन्स महिला संघाची कर्णधार आहे. खेळाडूंच्या लिलावात पहिल्यांदाच संघाची कर्णधार ऑक्शन टेबलवर बसल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१३ खेळाडूंच्या खरेदीसाठी MI च्या पर्समध्ये किती?
WPL २०२६ च्या मेगा लिलावात ७३ स्लॉटसाठी २७७ खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. लिलावात सहभागी खेळाडू ५० लाख, ४० लाख, ३० लाख, २० लाख आणि १० लाख रुपयांच्या स्लॅबमध्ये आहेत. मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघाने कर्णधार हमरनप्रीत कौरसह ५ खेळाडूंना रिटेन केले आहे. यात नॅटली सायव्हर ब्रंट (इंग्लंड), हेली मॅथ्यूज (वेस्टइंडीज), अमनजोत कौर आणि विकेटकीपर कमलानी जी हिचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सचा संघ १३ खेळाडूंच्या खरेदीसाठी लिलावात उतरला आहे. त्यांच्या पर्समध्ये ५.७५ कोटी रुपये इतकी रक्कम आहे. या पैशात ते कोणत्या खेळाडूला किती भाव देणार ते पाहण्याजोगे असेल.
Web Summary : Mumbai Indians owner Nita Ambani attended the WPL Mega Auction with captain Harmanpreet Kaur. This marks the first time a team captain has joined the auction table, signaling a strategic move for the franchise.
Web Summary : मुंबई इंडियंस की मालकिन नीता अंबानी कप्तान हरमनप्रीत कौर के साथ डब्ल्यूपीएल मेगा नीलामी में शामिल हुईं। यह पहली बार है कि कोई टीम कप्तान नीलामी टेबल पर शामिल हुई है, जो फ्रैंचाइज़ी के लिए एक रणनीतिक कदम का संकेत है।