WPL Auction 2023 Live : स्मृती मानधना ठरली सर्वात महाग खेळाडू; पाच फ्रँचायझींनी खर्च केले ६० कोटी

Women’s Premier League 2023 auction Live :  महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव मुंबईत आयोजित करण्यात आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 09:45 PM2023-02-13T21:45:18+5:302023-02-13T21:46:24+5:30

whatsapp join usJoin us
WPL Auction 2023 Live : WPL teams combined spent 59.50 crores in the auction, see all team player list and highest price taker  | WPL Auction 2023 Live : स्मृती मानधना ठरली सर्वात महाग खेळाडू; पाच फ्रँचायझींनी खर्च केले ६० कोटी

WPL Auction 2023 Live : स्मृती मानधना ठरली सर्वात महाग खेळाडू; पाच फ्रँचायझींनी खर्च केले ६० कोटी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Women’s Premier League 2023 auction Live :  महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव मुंबईत आयोजित करण्यात आला होता. पाच फ्रँचायझींनी ८७ खेळाडूंवर ५९.५० कोटी रुपये खर्च करून पहिला WPL लिलाव संपवला. BCCI ने लिलावासाठी ४०९ खेळाडूंची निवड केली होती, ज्यात २७० भारतीयांचा समावेश होता. भारतीय उपकर्णधार स्मृती मानधना  महिला प्रीमियर लीग (WPL) च्या लिलावात सर्वाधिक मानधन घेणारी खेळाडू. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) ३,४० कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले.

मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स, दिल्ली अन् गुजरात यांच्यावर RCB चा संघ पडतोय भारी; जाणून घ्या लिस्ट

 
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने १.८० कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या नॅट शीव्हर ब्रंटला सर्वाधिक ३.२० कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले. अष्टपैलू दीप्ती शर्मा ही भारताची दुसरी महागडी खेळाडू ठरली आणि तिला यूपी वॉरियर्सने २.६० कोटी रुपयांना संघात घेतले. आपल्या वेगवान फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेली शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांना दिल्ली कॅपिटल्सने अनुक्रमे २ आणि २.२० कोटी रुपयांना ताफ्यात घेतले. अष्टपैलू पूजा वस्त्राकर (मुंबई इंडियन्स) आणि रिचा घोष (आरसीबी) यांनाही प्रत्येकी १.९० कोटींची बोली लागली.    

महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स अशी संघांची नावं ठरवली गेली आहेत. 

  • दिल्ली कॅपिलट्सचा संघ - ( Delhi team for WIPL) - मेग लॅनिंग, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, लॉरा हॅरीस, जेसिया अख्तर, मॅरिझन्ने कॅप, शिखा पांडे, राधा यादव, मिन्नू मनी, तितास साधू, तारा नॉरिस, एलिसे कॅप्स, जेस जॉनासेन, स्नेह दीप्ती, अरुंधती रेड्डी, अपर्णा मोंडला, पूनम यादव, तानिया भाटीया

  • यूपी वॉरियर्स संघ ( UP Warriorz team for WPL) - दीप्ती शर्मा, एस यशश्री, सोफी एक्लेस्टन, लक्ष्मी यादव, ताहलिया मॅग्राथ, देविका वैद्य, शबनिम इस्मैल, ग्रेस हॅरीस, एलिसा हिली, लॉरेन बेल, अंजली सर्वणी, किरण नवगिरे, राजेश्वरी गायकवाड, सिमरन शेख, पार्शवी चोप्रा.

  • गुजरात जायंट्स ( Gujarat Giants Team For WPL ) - अॅश्ली गार्डनर, बेथ मुनी, दयालन हेमलथा, मानसी जोशी, अॅनाबेल सदरलँड, मोनिका पटेल, डिएंड्रा डॉटीन, सबिनेनी मेघना, सोफीया डंक्ली, सुष्मा वर्मा, हर्लीन देओल, हर्ली गाला, स्नेह राणा, अश्विनी कुमारी, जॉर्जिया वरेहम, परुणिका शिसोदिया, तनुजा कनवर, शबमन शकिल.

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB's team for WPL )- स्मृती मानधना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, रिचा घोष, एरिन बर्न्स, दीशा कसत, श्रेयंका पाटील, कनिका, ए शोबना, इंद्रानी रॉय, हिदर नाईट, डॅन व्हॅन निएकर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांझड, मीगन शुट, सहाना पवार  
  • मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians team for WPL) - हरमनप्रीत कौर, नॅट शिव्हर, एमिलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, जिंतिमणी कलित, नीलम बिष्ट.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: WPL Auction 2023 Live : WPL teams combined spent 59.50 crores in the auction, see all team player list and highest price taker 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.