हरलीन देओलच्या ब्युटीफुल इनिंगच्या जोरावर यूपी वॉरियर्सच्या संघाने अखेर यंदाच्या हंगामातील पहिला वहिला विजय नोंदवला आहे. महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामात पराभवाच्या हॅटट्रिकनंतर मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का देत यूपीच्या संघानं पहिल्या विजयाची नोंद केली. हरमनप्रीत कौरच्या MI नं पहिल्यांदा फलंदाजी करताना नॅट सायव्हर ब्रंटच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकांत ५ विकेट्सच्या मोबदल्यात १६१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हरलीन देओलनं नाबाद अर्धशतकी खेळी करत UP वॉरियर्स संघाला यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला.
MI चा ओनपिंगचा नवा अन् यशस्वी प्रयोग, नॅट सायव्हरनं तिसऱ्या क्रमांकावर ठोकली फिफ्टी
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात यूपी वॉरियर्सची कर्णधार मेग लेनिंग हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जी कमलिनीसह या सामन्यात अमनजोत कौरने मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात केली. युवा बॅटर जी कमलनी १२ चेंडूच सामना करून अवघ्या ५ धावांवर बाद झाली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली. अमनजोत कोरच्या रुपात मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का बसला. तिने ३८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर नॅट सायव्हर ब्रंटनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४३ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६५ धावांची खेळी केली. हरमनप्रीत कौर अवघ्या १६ धावांवर परतल्यावर अखेरच्या षटकात निकोल्स केरीनं २० चेंडूत ३२ धावांची खेळी करत मुंबईच्या संघाला १६१ धावांपर्यंत पोहचवले.
WPL 2026: Mumbai Indiansच्या सामन्यात दिसली Anaya Bangarची 'ग्लॅमरस' झलक, फोटोंचीही चर्चा
हरलीन देओलनं नाबाद अर्धशतकी खेळीसह लुटली मैफील
मुंबई इंडियन्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मेग लेनिंग आणि किरण नवगिरे या जोडीनं यूपी वॉरियर्सच्या संघाच्या डावाची सुरुवात केली. मेग लेनिंगच्या रुपात यूपीनं ४२ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. तिने २५ धावांची खेळी केली. ३ धावांची भर पडल्यावर किरण नविगरे १० धावा करून माघारी फिरली. फोबे लिचफिल्ड हिने २२ चेंडूत २५ धावांची उपयुक्त खेळी केली. हरलीन देोलनं ३९ चेंडूत १२ चौकाराच्या मदतीने ६४ धावा केल्या. क्लोई ट्रायॉन हिने ११ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारांच्या मदतीने नाबाद २७ धावांची नाबाद खेळी करत हरलीनला उत्तम साथ देत संघाला विजय मिळवून दिला.