महिला प्रिमियर लीग २०२६ च्या सलामीच्या लढतीत पहिल्यांदा फलंदाजी करताना अडचणीत सापडलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला सजीवन सजना हिच्या खेळीनं मोठा दिलासा दिला. गत हंगामात सिक्सर मारून MI ला जेतेपद मिळवून देणाऱ्या या स्फोटक बॅटरनं RCB विरुद्धच्या सामन्यात संघ संकटात असताना २५ चेंडूत १८० च्या स्ट्राईक रेटसह ४५ धावांची खेळी करत तिने संघाचा डाव सावरला. या खेळीत तिने ७ चौकार आणि १ षटकार मारला. याशिवाय निकोला कॅरी हिने २९ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने केलेल्या ४० धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघान निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १५४ धावा करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघासमोर १५५ धावांचे आव्हान ठेवले आहे. RCB च्या संघाकडून नादिन डी क्लार्क हिने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
Web Summary : Sajana's 45 off 25 balls rescued Mumbai Indians in WPL 2026 opener. Nicola Carey added 40, setting RCB a target of 155. De Klerk took 4 wickets for RCB.
Web Summary : सजना के 25 गेंदों में 45 रनों ने WPL 2026 के शुरुआती मैच में मुंबई इंडियंस को बचाया। निकोला कैरी ने 40 रन जोड़े, जिससे RCB को 155 रनों का लक्ष्य मिला। डी क्लर्क ने RCB के लिए 4 विकेट लिए।