महिला प्रिमियर लीग २०२६ च्या सलामीच्या लढतीत पहिल्यांदा फलंदाजी करताना अडचणीत सापडलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला सजीवन सजना हिच्या खेळीनं मोठा दिलासा दिला. गत हंगामात सिक्सर मारून MI ला जेतेपद मिळवून देणाऱ्या या स्फोटक बॅटरनं RCB विरुद्धच्या सामन्यात संघ संकटात असताना २५ चेंडूत १८० च्या स्ट्राईक रेटसह ४५ धावांची खेळी करत तिने संघाचा डाव सावरला. या खेळीत तिने ७ चौकार आणि १ षटकार मारला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
याशिवाय निकोला कॅरी हिने २९ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने केलेल्या ४० धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघान निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १५४ धावा करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघासमोर १५५ धावांचे आव्हान ठेवले आहे. RCB च्या संघाकडून नादिन डी क्लार्क हिने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
WPL 2026 : 'सिक्सर क्वीन' सजना MI च्या मदतीला धावली; RBC कडून Nadine de Klerk चा 'चौकार'
WPL मधील सर्वात यशस्वी बॅटरही स्वस्तात परतली माघारी
सलामीच्या लढतीत RCB ची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. MI कडून अमेलिया केर आणि जी कमालिनी या दोघींनी डावाची सुरुवात केली. पहिल्या पाच षटकात धावफलकावर फक्त २१ धावा असताना अमेलिया केरच्या रुपात MI ला पहिला धक्का बसला. ती १५ चेंडूत ४ धावा करून माघारी फिरली. तिची जागा घेण्यासाठी आलेल्या नॅट सायव्हर ब्रंटलाही सलामीच्या लढतीत खास छाप सोडता आली नाही. WPL मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड असलेल्या नॅटलीनं फक्त चार धावांची भर घालून बाद झाली.
सजना आणि निकोलनं सावरला MI चा डाव
सलामीची बॅटर कमालिनी २८ चेंडूत ३२ धावांवर बाद झाल्यावर कर्णधार हरमनप्रीत कौरनंही पॅव्हेलियनचा रस्ता धरला. तिने १७ चेंडूत २० धावा केल्या. ६७ धावांवर ४ विकेट्स गमावल्या असताना सजना आणि निकोला दोघींनी अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी करत संघाच्या धावफलकावर १५४ धावा लावल्या.
RCB कडून क्लर्कसह श्रेयंका अन् लॉरेन बेलचा जलवा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून नदिनी डी क्लर्क हिने ४ षटकांच्या कोट्यात २६ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय श्रेयंका पाटील आणि लॉरेन बेल या दोघींनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.