WPL 2026 : हरमनप्रीत एकटी लढली; MI कमी पडली; ॲशली गार्डनरच्या GG नं प्लेऑफ्स गाठली, आता...

अखेरच्या षटकापर्यंत हरमनप्रीत लढली, स्ट्राइक चेंज झालं अन् त्यासोबत मॅचही फिरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 23:16 IST2026-01-30T23:12:07+5:302026-01-30T23:16:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
WPL 2026 Harmanpreet Kaur Not Out 82 Runs But Gujarat Giants Register Their First Ever Win Against MI In WPL History And Qualify For The Eliminator | WPL 2026 : हरमनप्रीत एकटी लढली; MI कमी पडली; ॲशली गार्डनरच्या GG नं प्लेऑफ्स गाठली, आता...

WPL 2026 : हरमनप्रीत एकटी लढली; MI कमी पडली; ॲशली गार्डनरच्या GG नं प्लेऑफ्स गाठली, आता...

Gujarat Giants Register Their First Ever Win Against MI In WPL History And Qualify For The Eliminator : WPL च्या चौथ्या हंगामातील प्लेऑफ्ससाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सला पराभूत करत ॲशली गार्डनरच्या नेतृत्वाखालील गुजरातच्या संघाने प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारली आहे. कमालीची गोष्ट म्हणजे WPL च्या इतिहासात पहिल्यांदाच गुजरात जाएंट्सच्या संघाने मुंबई इंडियन्सला पराभूत केले आहे.  ॲशली गार्डनरने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार ॲशलीसह ४६ (२८), अनुष्का शर्मा ३३ (३१), सोफी डिवाइन २५ (२१) आणि जॉर्जियाने ४४ (२६) केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर गुजरातच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात १६७ धावा करत मुंबई इंडियन्ससमोर १६८ धावांचे टार्गेट सेट केले होते.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

हरमनप्रीत कौर एकटी लढली, शेवटी MI कमी पडली

गुजरातच्या संघाने दिलेल्या १६८ धावासंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. संघाच्या धावफलकावर अवघ्या २३ धावा असताना हेली मॅथ्यूजच्या रुपात संघाने पहिली विकेट गमावली. ती फक्त ६ धावांचे योगदान देऊन परतली. सजीवन सजनाने २५ चेंडूत २६ धावांची खेळी केली. संघ अडचणीत असताना हरमनप्रीत कौरनं कॅप्टन्सीला साजेशी खेळी करत संघाला सामन्यात आणले शेवटपर्यंत मैदानात थांबलेल्या हमरनप्रीत कौरनं ४८ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८२ धावांची खेळी केली. पण शेवटी मुंबई इंडियन्सचा संघ ११ धावांनी कमी पडला. 

बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर! WPLमध्ये जलवा बिखरणारी ही ग्लॅमर क्वीन कोण?

 तरच मुंबई इंडिन्सला आणखी एक संधी मिळेल 

WPL च्या यंदाच्या हंगामात स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने थेट फायनल गाठली आहे. आता त्यांच्यापाठोपाठ गुजरात जाएंट्सच्या संघाने ८ पैकी ५ विजयासह १० गुण खात्यात जमा करत प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारली आहे. आता उर्वरित एका जागेसाठी मुंबई इंडियन्सला संधी आहे. पण त्यांचे भवितव्य दिल्ली कॅपिटल्सच्या निकालावर अवलंबून आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने ८ सामन्यात ३ विजयासह ६ गुण कमावले आहेत. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. पण दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांना या स्थानावरून खाली खेचून प्लेऑफ्स गाठू शकतो. जेमिमाचा दिल्ली कॅपिटल्स आणि UP वॉरियर्स यांच्यात WPL च्या यंदाच्या हंगामातील शेवटचा साखळी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने विजय मिळवला तर एलिमिनेटरच्या लढतीत ते गुजरातला भिडतील. जर दिल्लीच्या पदरी पराभव पडला तर मुंबई इंडियन्ससाठी आणखी एक संधी मिळेल. 

Web Title : हरमनप्रीत की लड़ाई बेकार; गुजरात जायंट्स ने WPL प्लेऑफ में प्रवेश किया!

Web Summary : गुजरात जायंट्स ने मुंबई इंडियंस को हराकर WPL प्लेऑफ में जगह बनाई। हरमनप्रीत कौर के साहसी 82 रनों के बावजूद, गार्डनर की टीम ने 168 रनों का पीछा किया। एमआई 11 रन से पीछे रह गई।

Web Title : Harmanpreet's fight in vain; Gujarat Giants enter WPL playoffs!

Web Summary : Gujarat Giants defeated Mumbai Indians, securing a WPL playoff spot. Gardner's team chased down 168, despite Harmanpreet Kaur's valiant 82. MI fell short by 11 runs.