RCB vs DC WPL 2026 Final LIVE : स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि जेमिमा रॉड्रिग्जचादिल्ली कॅपिटल्स यांच्यात महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ फायनल खेळवण्यात येणार आहे. फिल्डबाहेर स्मृती आणि जेमिमा यांच्यातील मैत्री चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. आता फायनलमध्ये दोन जीवलग मैत्रीणीत कोण भारी ठरणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RCB आणि DC दुसरी फायनल! जेमी बदला घेणार की, स्मृती इतिहास रचणार?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात WPL च्या चौथ्या हंगामातील ही दुसरी फायनल आहे. याआधी २०२४ मध्ये या दोन संघातच फायनल खेळवण्यात आली होती. मेग लेनिंगच्या नेतृत्वाखालील संघाला पराभूत करत स्मृतीनं RCB ला पहिली ट्रॉफी जिंकून दिली होती. स्मृतीचा RCB दुसऱ्यांदा जेतेपद उंचावण्यासाठी उत्सुक असेल. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा संघ जेमीच्या कॅप्टन्सीत फायनलमधील पराभवाची मालिका खंडीत करणार का? ते पाहण्याजोगे असेल. याआधी २०२३ ते २०२५ पर्यंतच्या तिन्ही हंगामात दिल्ली कॅपिटल्सनं मेग लेनिंगच्या कॅप्टन्सीत फायनल खेळली. पण दोन वळा हरमनप्रीतनं तर एकदा स्मृतीनं या संघाच ट्रॉफीच स्वप्न उद्धवस्त केलं. WPL मधील सर्वात युवा कॅप्टन ठरलेली जेमी जेतेपदासह दिल्लीच तख्त राखणार का? ते पाहण्याजोगे असेल.
RCB vs DC WPL 2026 फायनल सामना कधी अन् कुठं रंगणार?
रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील WPL च्या चौथ्या हंगामाती फायनल सामना वडोदरातील कोटांबी येथील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. गुरवारी, ५ फेब्रुवारीला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल.
कुठे आणि कसा पाहता येईल हा सामना?
टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर या सामन्याचे थेट प्रेक्षपण करण्यात येईल. याशिवाय जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून क्रिकेट चाहते या सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य संघ ( RCB Predicted Playing XI)
स्मृती मंधाना (कर्णधार), ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वोल, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, नादिन डी क्लर्क, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, सायली सातघरे, अरुंधती रेड्डी / प्रेमा रावत, लॉरेन बेल
दिल्ली कॅपिटल्स (DC Predicted Playing XI)
शेफाली वर्मा, लिझेल ली (यष्टीरक्षक), लॉरा वोल्वार्ड्ट, जेमिमाह रोड्रिग्ज (कर्णधार), मॅरिझान कॅप, चिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, नंदिनी शर्मा, एन. श्री चरणी
Web Summary : RCB and DC face off in WPL 2026 final. Smriti's RCB seeks a second title against Jemimah's DC, who aim to break their finals losing streak. The match takes place on February 5th in Vadodara.
Web Summary : WPL 2026 के फाइनल में RCB और DC का मुकाबला। स्मृति की RCB का लक्ष्य जेमिमा की DC के खिलाफ दूसरा खिताब है, जो फाइनल में हार के सिलसिले को तोड़ना चाहती है। मैच 5 फरवरी को वडोदरा में होगा।