WPL 2026 Eliminator : मुंबई इंडियन्ससाठी कसं असेल फायनलचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर

इथं जाणून घेऊयात या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्ससमोर कुणाचे असेल आव्हान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 00:19 IST2026-01-30T00:16:40+5:302026-01-30T00:19:19+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
WPL 2026 Eliminator What will be the final equation for Mumbai Indians Know in detail Gujarat Giants Delhi Capitals Up Warriorz | WPL 2026 Eliminator : मुंबई इंडियन्ससाठी कसं असेल फायनलचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर

WPL 2026 Eliminator : मुंबई इंडियन्ससाठी कसं असेल फायनलचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर

WPL 2026 च्या चौथ्या हंगामातील साखळी फेरीतील दोन सामने शिल्लक असतानाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने यंदाच्या हंगामातील पहिल्या फायनलिस्टचा मान पटकावला आहे. आता स्पर्धेतील दुसरा फायनलिस्ट एलिमिनेटर लढतीनंतर निश्चित होणार आहे. RCB कडून झालेल्या पराभवानंतर UP वॉरियर्स संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले असून, आता फायनल गाठण्याच्या शर्यतीत तीन संघांमध्येच जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. यात WPL मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्ससह गुजरात जाएंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा समावेश आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!


गुजरात जाएंट्स-मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये तगडी स्पर्धा

WPL च्या फॉरमॅटनुसार गुणतालिकेतील अव्वल संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करतो, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांमध्ये एलिमिनेटर खेळवण्यात येतो. RCB ने थेट फायनलचं तिकीट मिळवलं आहे. सध्याच्या गुणतालिकेनुसार गुजरात जाएंट्स संघ ७ पैकी ४ विजयांसह ८ गुणांवर दुसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ मुंबई इंडियन्स ७ सामन्यांत ३ विजयांसह ६ गुणांवर तिसऱ्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघानेही ७ सामन्यांत ३ विजय मिळवत ६ गुणांची बरोबरी साधली आहे. तर UP वॉरियर्स संघ ७ पैकी फक्त २ विजयांसह ४ गुणांवर तळाला आहे.
 

नॅटली ते स्मृती! WPL इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाऱ्या 'रनरागिणी'

MI समोर ‘करा किंवा मरा’! असा आहे फायनलचा क्लिअर रोडमॅप

मुंबई इंडियन्स संघ साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना गुजरात जाएंट्सविरुद्ध खेळणार आहे. MI ने हा सामना जिंकल्यास त्यांच्या खात्यात ८ गुण जमा होतील आणि गुजरातचे गुणही ८ वरच राहतील. अशा परिस्थितीत नेट रनरेटच्या जोरावर MI एलिमिनेटरसाठी पात्र ठरू शकते. यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघासाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असणार आहे. हा सामना जिंकून मुंबई इंडियन्स स्वबळावर एलिमिनेटरमध्ये प्रवेश करू शकते. एलिमिनेटरमध्ये त्यांच्यासमोर गुजरात किंवा दिल्ली यापैकी एका संघाचं आव्हान असेल. ते पार केल्यास MI चं फायनल  तिकीट कन्फर्म होईल.

MI वर विजय गुजरातसाठी ठरेल फायद्याचा

दुसरीकडे, गुजरात जाएंट्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवल्यास त्यांचे एलिमिनेटरमधील स्थान जवळपास निश्चित होईल. त्याच वेळी दिल्ली कॅपिटल्ससाठीही समीकरण सोपं होईल. दिल्लीचा संघ आपला शेवटचा साखळी सामना UP वॉरियर्सविरुद्ध खेळणार आहे. हा सामना जिंकल्यास दिल्ली ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेऊ शकते आणि एलिमिनेटरमध्ये स्थान मिळवण्यासाठी मजबूत दावा ठोकू शकते.

नेट रनरेटचा खेळ! UP वॉरियर्स बिघडवू शकते गणित

जर मुंबई इंडियन्सला गुजरातकडून पराभव पत्करावा लागला, तर MI ६ गुणांवरच अडकणार आहे. अशातच UP वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला, तर तिसऱ्या स्थानासाठीमुंबई, दिल्ली आणि UP या तीन संघांमध्ये नेट रनरेटच्या जोरावर फैसला होईल.

 

Web Title : WPL 2026: मुंबई इंडियंस के फाइनल का समीकरण; 'करो या मरो' मुकाबला

Web Summary : RCB WPL 2026 के फाइनल में है। मुंबई इंडियंस, गुजरात जायंट्स और दिल्ली कैपिटल्स दूसरे स्थान के लिए प्रतिस्पर्धा कर रही हैं। एलिमिनेटर में जगह सुरक्षित करने के लिए MI को गुजरात के खिलाफ जीतना जरूरी है। हार से नेट रन रेट का खेल शुरू हो जाएगा।

Web Title : WPL 2026: Mumbai Indians' Final Equation Explained; 'Do or Die' Match

Web Summary : RCB is in the WPL 2026 final. Mumbai Indians, Gujarat Giants, and Delhi Capitals compete for the second spot. MI faces a must-win game against Gujarat to secure their place in the eliminator. A loss complicates their chances, bringing net run rate into play.