WPL 2026 Eliminator Delhi Capitals Women Delhi Beats Gujarat Giants Women To Enter Final : जेमिमा रॉड्रिग्सच्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने गुजरात जाएंटसविरुद्धची एलिमिनेटरची लढाई जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातच्या संघाने बेथ मूनीचं दमदार अर्धशतक आणि अखेरच्या षटकात जॉर्जिया वेरहॅम हिने केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १६८ धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर १६९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना जेमीच्या दिल्लीनं दिल्लीच्या संघाच्या नेतृत्वात बदल झाला, पण सलग च७ विकेट्स आणि २६ चेंडू राखून सामना जिंकत फायनलचं तिकीट मिळवलं. WPL च्या सलग चौथ्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे. याआधी मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला पहिल्या तीन हंगामात फायनल गाठल्यावर पराभवाचा सामना करावा लागला होता. जेमीच्या नेृत्वाखालील संघ स्मृतीच्या RCB ला पराभूत करत ही पराभवाची मालिका खंडीत करत पहिली WPL ट्रॉफी उंचावणार का? ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बेथ मूनीसह जॉर्जियाची उपयुक्त खेळी
पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात जाएंट्सची सुरुवात खूप खराब झाली. अवघ्या ५९ धावांवर संघाने पहिल्या चार विकेट्स गमावल्या होत्या. संघ अडचणीत असताना सलामीवीर बेथ मूनी हिने शेवटपर्यंत मैदानात थांबून ५१ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय जॉर्जियानं २५ चेंडूत केलेल्या ३५ धावांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर गुजरातच्या संघाने एलिमिनेटरच्या लढतीत १६८ धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीकडून शिनेल हेन्री (Chinelle Henry) हिने सर्वाधिक ३ तर नंदिनी शर्मानं २ विकेट्स घेतल्या. मिनू मनी हिनेही एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.
Nandani Sharma Record : हॅटट्रिक क्वीन नंदिनी शर्मानं रचला इतिहास! तिच्यासमोर अनुष्का शर्माही ठरली फिकी
विक्रमी विजयासह गाठली फायनल, शेफाली वर्मासह जेमीची धमाकेदार खेळी
धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या सलामी बॅटर्संनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. लीझेल ली ४३ (२४) आणि शेफाली वर्मा ३१ (२१) यांनी पहिल्या विकेटसाठी ४३ चेंडूत ८९ धावांची भागीदार करत सामन्यावर मजबूत पकड मिळवली. दोघीही अर्धशतका आधीच पॅव्हेलियनमध्ये परतल्या. त्यानंतर लॉरा आणि जेमी जोडी जमली. या दोघींनी ४१ चेंडूत ६८ धावांची भागीदारी रचत सामना सेट केला. जेमीनं २३ चेंडूत ४१ धावांची धमाकेदार खेळी केली. लॉरा नाबाद २४ चेंडूत ३२ धावा केल्या. दिल्लीच्या संघाने WPL मध्ये याआधी कधीच १६९ धावांचा पाठलाग केला नव्हता. विक्रमी विजयासह फायनल गाठल्यावर आता फायनलमध्ये जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध स्मृती मानधना या जीवलग मैत्रीणी जेतेपदासाठी एकमेकींविरोधात भिडताना दिसेल.