WPL 2026 Live Streaming : महिला प्रीमियर लीग (WPL 2026) च्या चौथा हंगामातील दुसऱ्या दिवशी क्रिकेट चाहत्यांना 'डबल हेडर'चा थरार अनुभवायला मिळणार आहे. १० जानेवारीला पहिला डबल हेडर डे आहे. दुपारच्या सत्रात गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात पहिली लढत खेळवण्यात येईल. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात दुसरा सामना खेळवला जाईल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जेमिमासाठी मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना ठरेल खास; कारण....
यंदाच्या हंगामात यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ नव्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतील. WPL 2026 मध्ये यूपीची कर्णधारपदाची जबाबदारी मेग लॅनिंगकडे आहे, तर दिल्लीची कर्णधार जेमिमा रोड्रिग्ज असेल. जेमिमा पहिल्यांदाच नेतृत्व करताना दिसणार आहे. त्यामुळे तिच्यासाठी मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना खास ठरेल.
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
WPL 2026 स्पर्धेतील पहिल्या डबल हेडरमधील पहिला सामना कधी अन् कुठं रंगणार?
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स (GG) विरुद्ध यूपी वॉरियर्स (UPW) यांच्यातील सामना खेळवला जाईल. दुपारी ३ वाजता नाणेफेकीनंतर ३ वाजून ३० मिनिटांनी या सामन्याची सुरुवात होईल. दोन्ही संघ विजयासह हंगामाची सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. तसेच या हंगामात आपले पहिले विजेतेपद जिंकण्याच्या दिशेने मजबूत पाऊल टाकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. गुजरात जायंट्सचे कर्णधारपद यंदा अॅश्ली गार्डनरकडे आहे.
MI सलग दुसऱ्या दिवशी खेळणार दुसरा सामना, हरमनप्रीतसमोर जेमिमा देणार चॅलेंज
हरमनप्रीत कौरचा मुंबई इंडियन्स संघाल सलामीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पराभवाचा धक्का दिला होता. गत विजेता मुंबई इंडियन्स संघ सलग दुसऱ्या दिवशी मैदानात उतरेल. यावेळी त्यांच्यासमोर गत उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असेल. ही लढत सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल.
WPL 2026 च्या डबल हेडरचा धमाका, हे सामने लाईव्ह कसे पाहायचे?
महिला प्रीमियर लीग 2026 चे लाईव्ह प्रसारण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जात आहे. तसेच जिओ हॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध आहे. जिओ हॉटस्टार अॅपवर WPL सामने मोफत लाईव्ह पाहता येतील.
Web Summary : WPL 2026 features a doubleheader: Gujarat Giants vs. UP Warriors and Mumbai Indians vs. Delhi Capitals. Jemimah Rodrigues captains Delhi, making the MI match special. Live on Star Sports and Jio Hotstar.
Web Summary : WPL 2026 में डबल हेडर: गुजरात जायंट्स बनाम यूपी वॉरियर्स और मुंबई इंडियंस बनाम दिल्ली कैपिटल्स। जेमिमा रोड्रिग्स दिल्ली की कप्तानी करेंगी, जिससे एमआई के खिलाफ मैच खास होगा। स्टार स्पोर्ट्स और जियो हॉटस्टार पर लाइव।