WPL 2026 Auction Deepti Sharma's Most Expensive Player : टीम इंडियाची वर्ल्ड कप-विजेती ऑलराउंडर दिप्ती शर्मा पुन्हा एकदा यूपी वॉरियर्सकडून खेळताना दिसणार आहे. WPL च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने वर्ल्ड कप स्पर्धा गाजवणाऱ्या दीप्तीला आपल्या संघात घेण्यासाठी तब्बल ३ कोटी २० लाख एवढी मोठी बोली लागली होती. पण कॅप्रि ग्लोबलच्या मालकीच्या यूपी वॉरियर्स फ्रँचायझी संघानं राइट टू मॅच (RTM) च्या माध्यमातून तेवढी रक्कम देण्याची तयारी दर्शवत दिप्तीला पुन्हा एकदा आपल्या संघात घेतले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महिला वर्ल्ड कप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी
दीप्ती शर्मा याआधीच्या तिन्ही हंगामात यूपी वॉरियर्सकडून खेळताना दिसली होती. WPL मेगा लिलावाआधी UP वॉरियर्स संघाने तिला रिलीज केले होते. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत २०० पेक्षा अधिक धावा आणि २० पेक्षा अधिक विकेट्स घेत तिने इतिहास रचला होता. महिला-पुरुष गटातील वर्ल्ड कप स्पर्धेत असा पराक्रम करणारी ती पहिली खेळाडू ठरली. त्यामुळे मेगा लिलावात तिच्यावर मोठी बोली लागणार हे जवळपास पक्के होते. संघ न बदलता ती सर्वात महागडी खेळाडू ठरली.
WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO)
८० लाखांच्या पगारवाढीसह ती पुन्हा UP वॉरियर्सची झाली
पहिल्या तिन्ही हंगामासाठी UP वॉरियर्सच्या संघाने तिच्यासाठी २ कोटी ६० लाख एवढी रक्कम मोजली होती. पण वर्ल्ड चॅम्पियन DSP दीप्ती शर्माला फ्रँचायझी संघाने ८० लाख पगारवाढीसह आपल्या संघात कायम ठेवण्याचा डाव खेळला. मेगा लिलावात दीप्ती शर्मा ८ मार्की प्लेयर्सपैकी एक होती. ५० लाख रुपयांसह तिने नाव नोंदणी केली होती. अपेक्षेप्रमाणे तिच्यावर मोठी बोली लागल्याचे पाहायला मिळाले.